Koffee With Karan 7 : करिना कपूर ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची खिल्ली उडवते तेव्हा...पाहा, प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:31 AM2022-08-03T11:31:52+5:302022-08-03T11:32:25+5:30

Koffee With Karan 7 : ‘कॉफी विद करण 7’चा होस्ट करण जोहरने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शोचा प्रोमो शेअर केला आहे. यात करिना कपूर व करण जोहर दोघंही मिस्टर परफेक्शनिस्टची मजा घेताना दिसत आहेत...

laal singh chaddha actor aamir khan kareena kapoor in Koffee With Karan 7 | Koffee With Karan 7 : करिना कपूर ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची खिल्ली उडवते तेव्हा...पाहा, प्रोमो

Koffee With Karan 7 : करिना कपूर ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची खिल्ली उडवते तेव्हा...पाहा, प्रोमो

googlenewsNext

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7 ) या शोची सध्या जोरदार चर्चा आहे. ओटीटीवर सुरू झालेल्या या शोमध्ये आत्तापर्यंत अनेक स्टार्स येऊन गेलेत. नव्या एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून येणार आहेत ते करिना कपूर (Kareena Kapoor)  आणि आमिर खान (Aamir Khan). नुकताच या नव्या एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला आणि हा प्रोमो पाहून चाहत्याच्या भुवया उंचावल्या.
शोचा होस्ट करण जोहरने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर हा प्रोमो शेअर केला आहे. यात करिना कपूर व करण जोहर दोघंही मिस्टर परफेक्शनिस्टची मजा घेताना दिसत आहेत. बेबोने  आमिरच्या एका सवयीचा खुलासा केला. शिवाय आमिरची ही सवय त्रासदायक असल्याचंही तिने म्हटले आहे.


 
 माझी अशी कोणती गोष्ट तुला खटकते किंवा सहन करावी लागते? असा एक प्रश्न आमिर करिनाला विचारते. यावर, ‘तू एक सिनेमा पूर्ण करण्यासाठी 200-300 दिवस घेतोस. अक्षय कुमार मात्र 30 दिवसांत एक सिनेमा पूर्ण करतो,’असं बेबो म्हणते. यावर आमिर आश्चर्य व्यक्त करतो.
  माझ्या फॅशन सेन्सला किती नंबर देशील? असं आमिर विचारतो. यावर मायनस.., असं बेबो म्हणते. यावर आमिर हिरमुसतो. करण तू जेव्हा केव्हा शो करतोस, अपमानच होतो, असं तो करणला हसत हसत म्हणतो.

तू लोकांच्या सेक्स लाईफ बोलतो तेव्हा...
करण नेहमीप्रमाणे आमिर व करिना यांना सेक्स लाईफबद्दल प्रश्न करतो. मुलं झाल्यानंतर क्वालिटी सेक्सबद्दल काय सांगशील ? असा प्रश्न करण करीनाला करतो. यावर करिनाने ‘याचं उत्तर तुला माहित नाही का?’ असा प्रतिप्रश्न करणला करते. हा शो माझी आई देखील पाहते असं करण त्यावर म्हणतो. मग आमिर करणची फिरकी घेतो. ‘जेव्हा तू इतरांच्या सेक्स लाइफबद्दल प्रश्न विचारतोस तेव्हा तुझी आई शो बघत नाही का?,’ असा सवाल आमिर करणला करतो आणि करण निरूत्तर होतो. एकूण आमिर आणि करीना सोबतच्या हा खास भाग धमाकेदार असणार हे प्रोमो पाहून लक्षात येतंय. उद्या 4 ऑगस्टला हा खास भाग प्रसारित होणार आहे.

Web Title: laal singh chaddha actor aamir khan kareena kapoor in Koffee With Karan 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.