आमिर खानचा लाल सिंग चड्ढा झाला फ्लॉप, निर्मात्याचं झालं इतक्या कोटींचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 05:16 PM2022-08-30T17:16:01+5:302022-08-30T17:26:12+5:30
Laal Singh Chaddha : 180 कोटीं रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या आमिर खानचा लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्याने निर्मात्यांचं मोठं नुकसान झालंय.
आमिर खान-करीना कपूर स्टारर 'लाल सिंह चड्ढा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.180 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ 56.83 कोटींचा बिझनेस केला. म्हणजेच, चित्रपटाला त्याच्या खर्चाच्या केवळ 31.57 टक्के कमाई करता आली आहे. अशा परिस्थितीत आता आमिर खान हा चित्रपट हिट करण्यासाठी जगभरातील कलेक्शनकडे लक्ष देत आहे. मात्र, वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकलेला नाही.
चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणाऱ्या आमिरकडून नक्कीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण असे झाले नाही. कारण आमिर खानचा चित्रपट 2022 च्या सर्वात मोठ्या फ्लॉपच्या यादीत सामील झाला आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे 'लाल सिंग चड्ढा' बॉक्स ऑफिसवर 50 टक्केही कमाई करू शकला नाही. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने केवळ 56.83 कोटींचा आकडा गाठला आहे.
OTTवर झाली इतक्या कोटींची डील
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी ओटीटीसमोर 150 कोटी रुपयांची डील ठेवली होती, परंतु नेटफ्लिक्सला ही रक्कम खूप जास्त वाटली, त्यामुळे नंतर ती 80 ते 90 कोटींमध्ये निश्चित झाली. पण जेव्हा लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला तेव्हा डील अवघ्या 50 कोटींवर आली. त्यामुळे निर्मात्यांना ३५ कोटींचा तोटा झाला आहे.