Laal Singh Chaddha Box Office Collection : 'लाल सिंग चड्ढा'ला पाच दिवसांत ५० कोटी कमावणंही झालंय कठीण, जाणून घ्या आतपर्यंतच्या कमाईचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:45 AM2022-08-16T10:45:02+5:302022-08-16T11:04:32+5:30

Laal Singh Chaddha : 180 कोटीं रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या आमिर खानच्या या ड्रिम प्रोजेक्टला ५० कोटींचा आकडा पार करणंही कठीण झालेलं दिसतंय.

Laal Singh Chaddha extended weekend box office day 5 box office collection | Laal Singh Chaddha Box Office Collection : 'लाल सिंग चड्ढा'ला पाच दिवसांत ५० कोटी कमावणंही झालंय कठीण, जाणून घ्या आतपर्यंतच्या कमाईचा आकडा

Laal Singh Chaddha Box Office Collection : 'लाल सिंग चड्ढा'ला पाच दिवसांत ५० कोटी कमावणंही झालंय कठीण, जाणून घ्या आतपर्यंतच्या कमाईचा आकडा

googlenewsNext

Laal Singh Chaddha Extended Weekend Box Office: आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. आमिर खानला त्याच्या या ड्रिम प्रोजेक्टकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. प्रमोशनमध्ये  आमिर खानने कोणतीच कसर सोडली नव्हती. 'लाल सिंग चड्ढा' मोठ्या धूमधडाक्यात रिलीज झाला होता. रक्षाबंधनच्या मूहुर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाचे गेल्या पाच दिवसांतील कमाईचे आकडे निराशाजनक आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 11.50 कोटींची ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटातच्या कमाईत मोठी घसरण दिसली, तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही तिच अवस्था होती. 

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'ने पहिल्या दिवशी 11. 50 कोटींची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7.25 कोटींची कमाई केली. मात्र, तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 कोटींचा गल्ला जमावला असून चौथ्या दिवशी 10 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडचा फायदा चित्रपटाला मिळेल आणि आकड्यांमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण सोमवारी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी या चित्रपटाने 8.50 कोटींची कमाई केली. 180 कोटीं रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपटने  रिलीजच्या 5 दिवसांत  आतापर्यंत एकूण 46.25 कोटींचा गल्ला जमावला आहे.

चित्रपटाचे हक्क मिळायला बरीच वर्षे लागली
या चित्रपटाच्या माध्यमातून आमिर खानने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केले आहे. त्याचा शेवटचा चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनंतर, चित्रपटाची अधिकृत घोषणा झाल्यापासून आणि 3 वर्षांहून अधिक काळ निर्मितीत असलेल्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. 'लाल सिंग चड्ढा'चे पटकथा लेखक अतुल कुलकर्णी आहेत. ऑस्कर विजेत्या 'फॅारेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. आमिरला या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळायला जवळपास 8 वर्षे लागली.
 

Web Title: Laal Singh Chaddha extended weekend box office day 5 box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.