ओरिजनल नाही तर चोरलेली आहे 'लापता लेडीज' ची आयडिया? 'बुर्का सिटी'चा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 19:14 IST2025-04-01T19:13:20+5:302025-04-01T19:14:14+5:30
रेडिट साईटवर 'बुर्का सिटी' (Burqa City) या शॉर्ट फिल्ममधला व्हिडिओ व्हायरल होतोय.

ओरिजनल नाही तर चोरलेली आहे 'लापता लेडीज' ची आयडिया? 'बुर्का सिटी'चा व्हिडिओ व्हायरल
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapata Ladies) हा जगभरात गाजलेला सिनेमा. यावर्षी भारताकडून हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. अगदी निरागस, हलकीफुलकी गोष्ट यामध्ये दाखवण्यात आली होती. दोन नवविवाहित नवरींची अदलाबदल होते. दोघीही आपल्या योग्य घरी कशा पोहोचतात आणि यादरम्यान काय काय घडतं याबद्दल हा सिनेमा आहे. छोट्याशा गावातली ही कहाणी आहे. सिनेमाची कथा, दिग्दर्शन आणि सर्वच कलाकारांचा अभिनय या सगळ्याचं खूप कौतुक झालं. पण आता 'लापता लेडीज'ची मूळ गोष्टच ओरिजनल नसून चोरलेली असल्याचं समोर आलं आहे.
रेडिट साईटवर 'बुर्का सिटी' (Burqa City) या शॉर्ट फिल्ममधला व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये नवविवाहित नवऱ्याची बायको मुस्लिम असते जिने बुर्का घातलेला असतो. नंतर जेव्हा तो बुर्का काढून पाहतो तेव्हा ती दुसरीच मुलगी असते. नंतर तो पोलिस स्टेशनमध्ये बायकोचा फोटो दाखवतानाही बुर्कातलाच दाखवतो. असंच काहीसं 'लापता लेडीज' मध्ये दाखवण्यात आलं आहे. सिनेमात फक्त घुंघट घातलेली नवरी असून हिरो घुंघटमधलाच फोटो पोलिसांना दाखवतो असं आहे. याचा अर्थ 'लापता लेडीज'ने बुर्का सिटीचीच संकल्पना चोरली आहे. याशिवाय १९९९ साली आलेल्या 'घुंघट के पट खोल' या सिनेमाचीही कथा अशीच आहे.
सोशल मीडियावरील हे व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे.'चोरी करुनही यशाचं सेलिब्रेशन कसे करु शकतात?','मूळ कल्पना असलेल्या लोकांसोबत हा अन्याय आहे','हे खूपच लज्जास्पद आहे','आणि हे त्यांनी ऑस्करला पाठवलं' अशा कमेंट्स युजर्सने केल्या आहेत.