ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 09:52 AM2024-11-13T09:52:00+5:302024-11-13T09:53:20+5:30

पुढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठित ऑस्कर सोहळ्यात 'लापता लेडीज' भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. काय आहे सिनेमाचं नवीन नाव?

Laapataa Ladies renamed as Lost Ladies for Oscars 2025 check out new poster | ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर

ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर

आमिर खान (Aamir Khan) निर्मित आणि किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित 'लापता लेडीज' (Laapata Ladies) या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अगदी हलकी फुलकी गोष्ट,  प्रभावी संवाद आणि नवोदित कलाकारांचा अप्रतिम अभिनयहे या सिनेमाला खास बनवतं. म्हणूनच भारताकडून या सिनेमाची निवड Oscars साठी करण्यात आली. पुढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठित ऑस्कर सोहळ्यात 'लापता लेडीज' भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान यासाठी लापता लेडीजचं नाव बदलण्यात आलं आहे. काय आहे नवीन नाव आणि त्याचं पोस्टर बघा.

किरण रावच्या 'लापता लेडीज' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमाने फारसं यश कमावलं नाही. पण जेव्हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला तेव्हा प्रत्येकाच्या तोंडावर 'लापता लेडीज'चंच नाव होतं. या सिनेमाची लोकप्रियता इतकी की आता थेट सिनेमा ऑस्करपर्यंत जाऊन पोहोचला आहे. दरम्यान सिनेमाच्या नावात लापता ऐवजी Lost असं करण्यात आलं आहे. 'lost ladies' नावाने सिनेमा अॅकॅडमी अवॉर्ड्सकडे पाठवण्यात आला आहे. सिनेमाचं नवीन पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे.


किरण राव आणि आमिर खान यांनी नुकतंच न्यूयॉर्क शहरातही सिनेमाचं प्रमोशन केलं. प्रसिद्ध शेफ विकास खन्नाने या स्पेशल इव्हेंटचं आयोजन केलं होतं. त्याच्या न्यूयॉर्क येथील रेस्टॉरंटमध्ये हा इव्हेंट झाला. 


'लापता लेडीज' यावर्षी १ मार्च रोजी रिलीज झाला होता. नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. तसंच छाया कदम या मराठमोळ्या अभिनेत्रीनेही उत्तम भूमिका साकारली आहे. 

Web Title: Laapataa Ladies renamed as Lost Ladies for Oscars 2025 check out new poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.