दीपिका पादुकोण पद्मावती नंतर बनणार लेडी डॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 10:59 AM2018-02-06T10:59:13+5:302018-02-06T16:29:13+5:30

संजय लीला भन्साळीच्या पद्मावत चित्रपटात राणी पद्मावती ची भूमिका करणारी दीपिका पादुकोण लवकरच नवीन वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिकाच्या ...

Lady Don after Deepika Padukone Padmavati | दीपिका पादुकोण पद्मावती नंतर बनणार लेडी डॉन

दीपिका पादुकोण पद्मावती नंतर बनणार लेडी डॉन

googlenewsNext
जय लीला भन्साळीच्या पद्मावत चित्रपटात राणी पद्मावती ची भूमिका करणारी दीपिका पादुकोण लवकरच नवीन वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिकाच्या पद्मावत चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींचा गल्ला जमावला आहे. त्याचबरोबर दीपिका आता विशाल भारद्वाजच्या चित्रपटात झळकणार आहे, वृत्तानुसार हा चित्रपट सुद्धा संजय लीला भन्साळी च्या पद्मावतसारखा बिग बजेट आणि एका विशेष पात्रावर आधारित असेल ज्यामध्ये दीपिका पादुकोण लेडी डॉनची भूमिका साकारणार आहे. 

टेलिग्राफ च्या नुसार दीपिका म्हणते ही एक गँगस्टर ची भूमिका आहे जिचे नाव "सपना दीदी"असे आहे हा चित्रपट हुसेन जायेदी चे पुस्तक "माफिया क्वीन ऑफ मुंबई" ह्यावर आधारीत असून ही एक सत्यघटनावर आधारित आहे. त्यामुळे ह्या भूमिकेवर मी जास्त मेहनत घेत आहे आणि या भूमिकेसाठी भरपूर शारीरिक बदल करायचे आहेत त्यावर मी आता काम करत आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती. रहीमाने आपल्या नवऱ्याच्या खूनचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॉन आखला होता. मात्र यात तिचाच मृत्यू झाला.सपना दीदी हे नाव बदलल्यानंतर चित्रपटाला काय नवीन नाव देण्यात येईल याचा पत्ता अजून लागला नाही आहे.  

ALSO READ :  ​SEE PICS : ‘पद्मावत’पेक्षाही सुंदर आहे दीपिका पादुकोणचा हा नवा अंदाज!!

वृत्तानुसार दीपिका ने ह्याधी सांगितले होते की मी विशाल भारद्वाजच्या चित्रपटात काम। करत आहे आणि दुसऱ्यांदा मी इरफान खान बरोबर काम करत आहे. ती म्हणते मला वाटते "सपना दीदी" ची कहाणी सगळ्यांना कळावी म्हणून मी हे कहाणी सगळ्यांना सांगू इच्छिते. हा चित्रपट २०१८ च्या अखेरीस पडद्यावर येईल. दीपिका ला प्रेक्षकांनी राणी पद्मावत च्या रुपात पाहून तिचे भरपूर कौतुक केले आहे.

Web Title: Lady Don after Deepika Padukone Padmavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.