‘मॉम’चा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारण्यासाठी पोहोचली लेक जान्हवी; बोनी कपूरला झाले अश्रू अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 11:45 AM2018-05-03T11:45:50+5:302018-05-03T17:21:29+5:30

मुलगी जान्हवी कपूरने ‘मॉम’ श्रीदेवी यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. यावेळी बोनी कपूर यांना अश्रू अनावर झाले होते.

Lake Jannavi reached Mamma's national award; Bonnie Kapoor tears away tears! | ‘मॉम’चा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारण्यासाठी पोहोचली लेक जान्हवी; बोनी कपूरला झाले अश्रू अनावर!

‘मॉम’चा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारण्यासाठी पोहोचली लेक जान्हवी; बोनी कपूरला झाले अश्रू अनावर!

googlenewsNext
िनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांना पहिल्या मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘मॉम’ या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांचा हा पुरस्कार मोठी मुलगी जान्हवी कपूरने स्वीकारला. यावेळी जान्हवीने साडी परिधान केली होती. तिच्यासोबत पापा बोनी कपूर आणि लहान बहीण खुशीही उपस्थित होती. दिल्ली येथील विज्ञान भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान, पुरस्कार स्वीकारताना बोनी कपूर खूपच भावनिक झाल्याचे दिसून आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. यावेळी बोनी कपूर यांनी म्हटले की, ‘आमच्या परिवारासाठी हा एक गर्वाचा क्षण आहे. संपूर्ण परिवार आणि मी श्रीला खूप मिस करत आहोत. श्री आमच्यासोबत नाही, परंतु ती जिथे असेल तिथे खूप आनंदी असेल. 
 

श्रीदेवी यांच्या आठवणी सांगताना बोनी कपूरला अश्रू अनावर झाले होते. यावेळी दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीनेही आईचे स्मरण केले. १९८९ मध्ये आलेल्या ‘चांदनी’ या श्रीदेवीच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्रीदेवी यांनी बॉलिवूडसह विविध भाषांमधील ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. 
 

चित्रपटसृष्टीत विशेष योगदान दिल्याबद्दल ६५व्या राष्टÑीय पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. श्रीदेवी यांच्या अखेरच्या ‘मॉम’ या चित्रपटासाठीच त्यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. श्रीदेवी यांनी ‘मॉम’ या चित्रपटात एका अशा आईची भूमिका साकारली होती. जिची मुलगी बलात्कार पीडित होती. तिला न्याय मिळवून देण्यासाठी एका आईचा लढा चित्रपटात दाखविण्यात आला होता. 

Web Title: Lake Jannavi reached Mamma's national award; Bonnie Kapoor tears away tears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.