भूमी पेडणेकर आणि सुशांतसिंग राजपूत बनणार डाकू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 12:21 PM2017-08-03T12:21:52+5:302017-08-03T17:55:59+5:30

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत डाकू या विषयावर अनेक चित्रपटात येऊन गेले आहेत. मेरा गाव मेरा देश, मदर इंडियापासून ते शेखर कपूरचा ...

Land Pudanekar and Sushant Singh Rajput will be the villain | भूमी पेडणेकर आणि सुशांतसिंग राजपूत बनणार डाकू

भूमी पेडणेकर आणि सुशांतसिंग राजपूत बनणार डाकू

googlenewsNext
लिवूडमध्ये आतापर्यंत डाकू या विषयावर अनेक चित्रपटात येऊन गेले आहेत. मेरा गाव मेरा देश, मदर इंडियापासून ते शेखर कपूरचा बँडिड क्वीनपर्यंत. आता याच विषयावर पुन्हा एकदा इश्किया आणि उडता पंजाबचा दिग्दर्शक अभिषेक चौबे आणखीन एक चित्रपट घेऊन येतो आहे. ज्यात भूमी पेडणेकर आणि सुशांतसिंग राजपूत दोघेही डाकू बनणार आहेत. 
सुशांत सिंगने ही भूमिका साकारण्यासाठी आधीच होकार दिला आहे फक्त भूमीची एन्ट्री या चित्रपटात आता झाली आहे. भूमीला या चित्रपटासाठी एक महिनाआधीच विचारण्यात आले होते. या चित्रपटाचे शूटिंग चंबळच्या जंगलात करण्यात येणार आहे. अभिषेक आणि त्याच्या टीमने लोकेशन शोधण्यास सुरुवात देखील केली आहे. या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे. हा चित्रपट अभिषेकला मार्च 2018 पर्यंत पूर्ण करायचा आहे. 

ALSO READ : OMG: सुशांत सिंग राजपूत नासामध्ये घेतोय ट्रेनिंग

या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला करणार आहे. सुदीप शर्मा दिग्दर्शक अभिषेकबरोबर बसून या चित्रपटाची कथा लिहितो आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, ''आजपर्यंत आपण डाकूची फक्त एकच बाजू बघतो. आपण सगळे फक्त डाकू हा शब्द ऐकूनच घाबरतो,  डाकूवर ८० पेक्षा जास्त मर्डर केस आहेत पण त्यामागचे सत्य कोणालाच ऐकायचे नसते किंवा जाणून ही घ्यायचे नसते. मी हेच सत्य या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे"

सध्या सुशांत नासाला जाऊन त्याचा आगामी चित्रपट चंदा मामा कूर के साठी ट्रेनिंग घेतो आहे. तर भूमीचा ‘टॉयलेट एक प्रेमकथा' लवकरच रिलीज होणार आहे. 

Web Title: Land Pudanekar and Sushant Singh Rajput will be the villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.