भाईजानची हिरोईन लेरिसा बाँजी व गुरू रंधावा या गोष्टीसाठी आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 03:37 PM2020-02-20T15:37:00+5:302020-02-20T15:37:41+5:30

ब्राझिलीयन मॉडेल व डान्सर लेरिसा बाँजी सलमान खानसोबत झळकणार असल्याचे बोलले जात आहे.

Larissa Bonesi and Guru Randhawa coming together for Surma Surma | भाईजानची हिरोईन लेरिसा बाँजी व गुरू रंधावा या गोष्टीसाठी आले एकत्र

भाईजानची हिरोईन लेरिसा बाँजी व गुरू रंधावा या गोष्टीसाठी आले एकत्र

googlenewsNext


ब्राझिलीयन मॉडेल व डान्सर लेरिसा बाँजी आणि गायक गुरू रंधावा यांचे नवीन गाणे नुकतेच दाखल झाले आहे. या गाण्याचे नाव आहे सुरमा सुरमा. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या गाण्याचा टीझर रिलीज झाल्यावर लेरिसाला तिच्या चाहत्यांकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या म्युझिक व्हिडिओमध्ये लॅरिसा खूपच सुंदर दिसते आहे. 

सुबह होने ना दे या गाण्यापासून लॅरिसा तिच्या किलर डान्स मूव्हजसाठी ओळखली जाते.  बी टाऊनमध्ये टायगर श्रॉफ आणि सुरज पांचोलीसोबतही एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूडमधील करियरची सुरूवात गो गोवा गॉन सिनेमातून केली आहे. या चित्रपटात तिने सहायक कलाकाराची भूमिका केली होती. या चित्रपटात सैफ अली खान, कुणाल खेमू व वीर दास मुख्य भूमिकेत होते.


अलीकडेच सलमान खानसमवेत लॅरिसाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा हा फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत दिलेली हिंट आहे. मात्र लेरिसा कोणत्या प्रोजेक्टमध्ये सलमान खानसोबत दिसणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

सलमानचा आगामी चित्रपट 'कभी ईद कभी दिवाली'मध्ये पूजा हेगडेची वर्णी लागल्याचे वृत्त नुकतेच समोर आले. पूजा या चित्रपटात सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात पूजा हेगडे सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका करताना दिसणार आहे. पूजाबद्दल सांगताना निर्माता व लेखक साजिद नाडियादवाला म्हणाला की, हाऊसफुल ४'मध्ये पूजासोबत काम केल्यानंतर, आम्हाला हे जाणवले की ती या चित्रपटासाठी एकदम परफेक्ट आहे आणि सलमानसोबत तिची जोडी चांगली वाटेल. या कथेत नावीण्य आणेल.

Web Title: Larissa Bonesi and Guru Randhawa coming together for Surma Surma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.