...मृत्यूपूर्वीची श्रीदेवी यांच्या आयुष्यातील 'ती' अखेरची 30 मिनिटं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 04:18 AM2018-02-26T04:18:12+5:302018-02-26T09:51:53+5:30
श्रीदेवी यांची अकाली एक्सिट सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठिण जातेय की त्या ...
श रीदेवी यांची अकाली एक्सिट सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठिण जातेय की त्या आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. यूएईमधल्या खलीज टाईम्सच्या रिपोर्टमध्ये श्रीदेवी यांच्या शेवटच्या 30 मिनिटांमध्ये नक्की काय घडले याचा आढावा घेण्यात आला आहे. खलीज टाईम्सयच्या रिपोर्टनुसार श्रीदेवी पती बोनी कपूर यांच्यासोबत डिनरला जाण्यासाठी तयार होत होत्या.
शनिवारी रात्री बोनी कपूर मुंबईतून परत दुबईत गेले. त्यांना श्रीदेवी यांना सरप्राईज डिनरवर घेऊन जायचे होते. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना हॉटेलच्या रुममध्ये जाऊन उठवले आणि 15 मिनिट दोघांनी गप्पा मारल्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवींना डिनरला जाण्यासाठी तयार व्हायला सांगितले. श्रीदेवी तयार होण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्या. त्यानंतर 15 मिनिट त्या बाहेर आल्या नाहीत मग बोनी कपूर यांना वॉशरुमचा दरवाजा वाजवला त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बोनी कपूर यांनी तो दरवाजा धक्का देऊन उघडला तर आता श्रीदेवी या बाथटबमध्ये पडल्या होत्या. बोनी कपूर यांनी त्यांना शुद्धत आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्या उठल्या नाही. बोनींनी यानंतर आपल्या मित्राला फोन केला त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. श्रीदेवी यांना ताबडतोब रूग्णालयात हलवण्यात आले. रूग्णालयात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, हे स्पष्ट झाले. याच झटक्याने त्यांचे निधन झाले.
ALSO READ : मॉम श्रीदेवीच्या निधनाची बातमी कळताच जान्हवी कपूर पडली बेशूद्ध!
मोहित मारवाह विवाह सोहळ्यात भाग घेण्यासाठी श्रीदेवी दुबईत गेल्या होत्या. अख्खे कपूर घराणे या सोहळ्यात हजर होते. श्रीदेवीही या विवाह सोहळ्यात सामील झाल्या होत्या .पती बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशी त्यांच्यासोबत होते. मोठी मुलगी जान्हवी ही मात्र ‘धडक’ या आपल्या पहिल्या वहिल्या डेब्यू सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी असल्याने या सोहळ्याला हजर राहू शकली नव्हती. 1978 साली सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या.