या अभिनेत्रीच्या अंतिम यात्रेला हजर होते केवळ पाच-सहा लोक, पैशांच्या कमतरतेमुळे शेवटच्या दिवसांत करावे लागले होते हे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 07:09 AM2018-03-05T07:09:24+5:302018-03-05T13:09:03+5:30
हमराज या चित्रपटात सुनील दत्त, राज कुमार यांच्यासोबत अभिनेत्री विमी देखील मुख्य भूमिकेत होती. हा विमीचा पहिलाच चित्रपट असला ...
ह राज या चित्रपटात सुनील दत्त, राज कुमार यांच्यासोबत अभिनेत्री विमी देखील मुख्य भूमिकेत होती. हा विमीचा पहिलाच चित्रपट असला तरी प्रेक्षकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. विमीच्या सौंदर्याच्या प्रेमात प्रेक्षक पडले होते. तिला मिळत असलेली लोकप्रियता पाहाता आपल्या चित्रपटात विमीने काम करावे अशी अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांची इच्छा होती. त्यामुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळत होत्या. तिने पतंगा, गुड्डी, कहानी हम सब की यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले.
विमीने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधीच तिचे लग्न झाले होते. शिव अग्रवाल असे तिच्या पतीचे नाव असून ते प्रसिद्ध व्यवसायिक होते. एका पार्टीमध्ये संगीतकार रवी यांनी विमी यांना पाहिले आणि विमी यांचे चित्रपटसृष्टीत चांगले करियर होऊ शकते असे त्यांना सांगितले. रवी यांच्या सांगण्यावरून विमी आणि शिव मुंबईत आले आणि रवी यांनीच बी.आर.चोप्रा यांच्यासोबत त्यांची ओळख करून दिली. हमराज या पहिल्याच चित्रपटामुळे विमी स्टार बनली होती. त्या काळात एका चित्रपटासाठी विमी लाखो रुपये घेत असे. विमीला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. पण त्यांच्या करियरमध्ये त्यांचे पती चांगलेच ढवळाढवळ करत होते. विमीने कोणता चित्रपट स्वीकारायचा आणि कोणता नाही हे देखील ते ठरवायला लागले होते. या सगळ्यामुळे कंटाळून विमी एकटी राहायला लागली. पती कामात हस्तक्षेप करत असल्याची बातमी दिग्दर्शक, निर्मात्यांना देखील कळल्यामुळे विमीला त्यांनी चित्रपट ऑफर करणेच बंद केले होते. विमीचे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत होते. तिची आर्थिक परिस्थिती प्रचंड खराब झाल्यामुळे तिने जुहू येथील तिचे घर विकले आणि एका छोट्याशा घरात ती राहायला लागली. या सगळ्या गोष्टीमुळे तिचे पती दारुच्या अधीन गेले. अगदी कमी पैशांसाठी देखील काम करायला ती तयार होती. पण तरीही तिला काम मिळत नव्हते. या सगळ्यामुळे ती ड्रिप्रेशनमध्ये गेली आणि प्रचंड दारू प्यायला लागली. एवढेच नव्हे तरी वेश्याव्यवसायकडे देखील वळली होती.
विमी शेवटच्या दिवसांत आजारपणामुळे नानावटी हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये होती. तिच्या मृत्यूनंतर तर तिचे अंतिम संस्कार देखील करायला कोणाकडे पैसे नव्हते. भाजी विकण्याच्या गाडीवरून तिचे पार्थिव नेण्यात आले होते. तिच्या अंतिमयात्रेला केवळ चार ते पाच लोक उपस्थित होते.