सुशांतने ज्या हाउस स्टाफ सदस्यासोबत केली होती शेवटची बातचीत, आता तो करतोय या बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी काम
By तेजल गावडे | Published: October 1, 2020 11:30 AM2020-10-01T11:30:23+5:302020-10-01T11:37:54+5:30
सुशांत सिंग राजपूतच्या निधनादिवशी वांद्रेमधील फ्लॅटमध्ये पाच लोक उपस्थित होते. त्याचा कुक नीरजपासून हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा पर्यंत सर्वजण सीबीआयच्या रडारवर आहे
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनादिवशी वांद्रेमधील फ्लॅटमध्ये पाच लोक उपस्थित होते. सुशांतच्या निधनानंतर सगळे लोक चर्चेत आले. त्याचा कुक नीरजपासून हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा पर्यंत सर्वजण सीबीआयच्या रडारवर आहे. यादरम्यान सुशांतच्या हाउस स्टाफमधील सदस्य केशव मीडियासमोर येण्यापासून वाचला आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केशव एका अभिनेत्रीच्या मुंबईतील घरी काम करतो आहे.
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, एका वाहिनीने त्यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये खुलासा केला आहे की केशव अभिनेत्री सारा अली खानच्या घरी काम करतो आहे. साराच्या निवासच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे की केशव साराच्या इथे काम करतो आहे. जेव्हा वाहिनीने फोनवर केशवसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला की, आता मला सोडून द्या. माझ्यासाठी हे प्रकरण संपले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीरजच्या काकांनी सांगितले होते की, केशव आता सारा अली खानच्या घरी काम करतो आहे. तो जेवणदेखील बनवतो तर मॅडमने त्याला बोलवले तर तो तिथे गेला. दोन दिवसांपूर्वीच तो गोव्यावरून मुंबईला आला आहे. नीरज सुशांतचा कुक होता. सूत्रांच्या माहितीनुसार, पुन्हा केशव केशवला सीबीआय चौकशीसाठी बोलवू शकतात.
यापूर्वी नीरजने एका मुलाखतीत सांगितले होते की १४ जूनला केशवने सुशांतला ब्रेकफास्टसाठी विचारले होते तेव्हा सुशांतने त्याला नारळ पाणी, ऑरेंज ज्यूस आणि केळी हवे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सुशांतने नारळ पाणी व ज्यूस प्याला आणि केळनंतर खाणार असे सांगितले. केशवनेच सुशांतसोबत शेवटची बातचीत केली होती.
ड्रग्स प्रकरणी सारा अली खानची झाली होती चौकशी
२६ सप्टेंबरला एनसीबीने सारा अली खानसोबत ड्र्ग्स प्रकरणी चौकशी केली होती. चौकशीत सारा अली खानने सांगितले की सुशांतला तिने ड्रग्स घेताना पाहिले होते. तिने सुशांतला व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्स घेताना पाहिले होते. साराने सांगितले की ती फक्त सिगरेट पीत होती.