अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले; कंगनाचा मूव्ही माफियांना जोरदार टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 08:32 IST2020-08-25T01:30:43+5:302020-08-25T08:32:11+5:30
स्टारपुत्रांना पुढे आणण्यासाठी व इतरांना मागे ढकलण्यासाठी चित्रपटसृष्टीतील माफिया कायमच सक्रिय असतात असा आरोप कंगनाने याआधी काही वेळा केला आहे.

अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले; कंगनाचा मूव्ही माफियांना जोरदार टोला
नवी दिल्ली : माझ्यावर बहिष्कार घालण्यासाठी चित्रपटसृष्टीतील माफियांनी टिष्ट्वटरवर तसा ट्रेंड सुरू केला आहे, असा आरोप प्रख्यात अभिनेत्री कंगना राणावत हिने केला आहे. अखेर उंदीर बिळातून बाहेर आले, अशी तिखट प्रतिक्रिया तिने दिली आहे.
स्टारपुत्रांना पुढे आणण्यासाठी व इतरांना मागे ढकलण्यासाठी चित्रपटसृष्टीतील माफिया कायमच सक्रिय असतात असा आरोप कंगनाने याआधी काही वेळा केला आहे. कंगना राणावतने एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले. चित्रपटसृष्टीतील माफिया थोडे हातपाय तर हलविणारच.
गेल्या आठवड्यात कंगना राणावतने असा दावा केला होता की, चित्रपटसृष्टीतील माफिया माझे टिष्ट्वटरवर अकाऊंट बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. कंगना राणावतची बहिण व तिची व्यवस्थापक रंगोली चंडेल हिचे टिष्ट्वटरवर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आले होते. तिने धार्मिक तेढ वाढविणाऱ्या पोस्ट तिथे केल्या होत्या असा आक्षेप अनेकांनी घेतल्याने टिष्ट्वटरने ही कृती केली होती. कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले होते की, चित्रपटसृष्टीतील माफियांचे रॅकेट टिष्ट्वटरवर सक्रिय असून त्यांचे विचार देशद्रोही स्वरुपाचे आहेत.