हॉस्पिटलमधील ऋषी कपूर यांचा शेवटचा व्हिडिओ होतोय व्हायरल?, जाणून घ्या या मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:16 PM2020-04-30T17:16:09+5:302020-04-30T17:16:41+5:30

हॉस्पिटलमधील ऋषी कपूर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

The last video of Rishi Kapoor in the hospital is going viral ?, know the truth behind this tjl | हॉस्पिटलमधील ऋषी कपूर यांचा शेवटचा व्हिडिओ होतोय व्हायरल?, जाणून घ्या या मागचं सत्य

हॉस्पिटलमधील ऋषी कपूर यांचा शेवटचा व्हिडिओ होतोय व्हायरल?, जाणून घ्या या मागचं सत्य

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर लोकांचा विश्वासच बसत नाही आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांचे फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहत आहेत. यादरम्यान त्यांचा एक इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील लेखक व दिग्दर्शक मुराली लालवानीने शेअर केला आहे. हा व्हिडिओ काल रात्रीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओत ऋषी कपूर हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहेत. मात्र हा व्हिडिओ आताचा नसून फेब्रुवारी महिन्यातील आहे.

ऋषी कपूर या व्हिडिओत हॉस्पिटलमधील बेडवर असून त्यांच्या बाजूला एक माणूस गाणं गात आहे. 'तेरे दर्द से दिल आबाद रहा' हे त्या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ऋषी कपूरदेखील एन्जॉय करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हा व्यक्ती डॉक्टर असल्याचं सांगितलं जात आहे. हे गाणं ऐकल्यानंतर ऋषी कपूर यांनी त्याचं कौतूकदेखील केले आणि आशीर्वादही दिला.

ते म्हणाले की, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. खूप यश मिळव, मेहनत कर, श्रीमंती बघ, नाव कमव हे सगळे मेहनत केल्यानंतर मिळते. जेव्हा मेहनत आणि थोडे नशीबाची साथ मिळाली की फळ स्वतःहून झाडावर लागतात. बस हेच करायचे होते.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. व्हिडिओ युट्युबवर डी के कुमार सानू या व्यक्तीने 29 फेब्रुवारी, 2020मध्ये अपलोड केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटचा नसल्याचे स्पष्ट होते.

Web Title: The last video of Rishi Kapoor in the hospital is going viral ?, know the truth behind this tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.