Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील १० रंजक गोष्टी, ज्या क्वचितच लोकांना असेल माहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 10:22 AM2022-02-06T10:22:57+5:302022-02-06T10:25:30+5:30

Lata Mangeshkar Passes Away: भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. लता दीदी यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. आज आम्ही तुम्हाला दीदींच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत.

Lata Mangeshkar Passes Away: 10 interesting things about Lata Mangeshkar's life that people rarely know | Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील १० रंजक गोष्टी, ज्या क्वचितच लोकांना असेल माहीत

Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील १० रंजक गोष्टी, ज्या क्वचितच लोकांना असेल माहीत

googlenewsNext

Lata Mangeshkar Passes Away: भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. लता दीदी यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. गेली ६-७ दशकांपासून भारतीय चित्रपटांना आपला आवाज देणाऱ्या लतादीदींनी सुरमयी आणि मंजुळ आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. आज आम्ही तुम्हाला दीदींचीबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत.

 - वडील दीनानाथ आणि आई शेवंती यांनी त्यांचे नाव हेमा ठेवले होतं.
 
- पहिली मंगळागौर (१९४२) या चित्रपटामध्ये त्यांनी छोटी भुमिका केली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे गीत देखील गायले. दीदींनी माता एक सपूत की 'दुनिया बदल दे तू हे हिंदी भाषेतील पहीले गाणे गजाभाऊ (१९४३) या मराठी चित्रपटासाठी गायले.

- उस्ताद अमानत अली खाँ ह्यांच्याकडून दीदी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँनी नवनिर्मीत पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ देवासवालेंकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या.

- आनंदघन या नावानेही ती गाणी संगीतबद्ध केली होती. त्यांनी बंगाली भाषेत 'तारे आमी चोखने देखनी' आणि 'आमी नी' ही गाणी संगीतबद्ध  केली होती.

- लतादीदींनी संगीतबद्ध केलेली बंगाली गाणी किशोर कुमार यांनी गायली होती.

-.इतरांसाठी आदर्श असणा-या लतादीदी अभिनेता आणि गायक कुंदनलाल सेहगल यांना आदर्श मानायच्या. अख्ख्या जगावर आपल्या आवाजाने जादू करणा-या लतादिदी कुंदनलाल सेहगल यांच्या आवाजावर फिदा होत्या. त्या लहानपणापासून त्यांच्या आवाजतली गाणी ऐकत मोठ्या झाल्या. गायकीचे खरे संस्कार त्यांच्यावर सेहगल यांच्या गाणी ऐकतच झाले असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ज्या दिवशी लता मंगेशकर सेहगल यांना भेटायला जाणार होत्या त्याच्या आदल्या दिवशीच सेहगल यांच्या निधनाची बातमी आली. आणि म्हणून लतादीदी यांचे सेहगल यांना भेटण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

-.लता मंगेशकर यांच्या घरात एक पाळीव कुत्रा आहे. हा लता दीदींचाही मोठा चाहता होतो. तो जास्तीत जास्त लता दीदींच्या रूममध्ये असायचा.

-. लता दीदीं दिवाळी निमित्त त्यांचे हितचिंतक आणि जवळच्या मित्रांना काही ना काही भेटवस्तू पाठवतात. जया बच्चन आणि हेमा मालिनी यांना देखील दरवेळी भेटवस्तू रूपात साड्या पाठवायच्या.

- गाण्यासोबतच लतादीदींना फोटो काढण्याचीही खूप आवड होती.

- लतादीदींनी 'वादळ' (मराठी), 'झांझर', 'कांचन' आणि 'लेकिन' (हिंदी) या चित्रपटांचीही निर्मिती केली होती.

Web Title: Lata Mangeshkar Passes Away: 10 interesting things about Lata Mangeshkar's life that people rarely know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.