Lata Mangeshkar : मुके शब्द... बोलकी आसवं...! गानकोकिळा लता दीदींच्या जाण्यानं बॉलिवूड स्तब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 11:50 AM2022-02-06T11:50:00+5:302022-02-06T11:50:02+5:30

Lata Mangeshkar passes away Bollywood Celebs Reaction : लता दीदींच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. स्वर्गीय सूर कायमचा हरपला, हे ऐकून प्रत्येकजण हळहळला. जगभरातील त्यांचे चाहते स्तब्ध झालेत.

lata mangeshkar passes away bollywood express grief on her demise | Lata Mangeshkar : मुके शब्द... बोलकी आसवं...! गानकोकिळा लता दीदींच्या जाण्यानं बॉलिवूड स्तब्ध

Lata Mangeshkar : मुके शब्द... बोलकी आसवं...! गानकोकिळा लता दीदींच्या जाण्यानं बॉलिवूड स्तब्ध

googlenewsNext

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली. लता दीदींच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. स्वर्गीय सूर कायमचा हरपला, हे ऐकून प्रत्येकजण हळहळला. जगभरातील त्यांचे चाहते स्तब्ध झालेत. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

 ए आर रहमान

शंकर महादेवन

अक्षय कुमार

अनिल कपूर

अजय देवगण

जेनेलिया डिसूजा देशमुख

बोनी कपूर

सुभाष घई

शबाना आझमी

दीया मिर्झा

वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र रविवारी सकाळी 8.12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचे मल्टी-ऑर्गन फेल्युअरने निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली.  लतादीदींच्या निधनाने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: lata mangeshkar passes away bollywood express grief on her demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.