AI ची कमाल! लता मंगेशकरांच्या आवाज रेकॉर्ड केलं 'राम आएंगे'; गाणं ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, क्या बात!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 02:36 PM2024-01-21T14:36:53+5:302024-01-21T14:37:48+5:30
AI ने तयार केलेलं हे गाणं ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल
सध्या संपूर्ण देशभरात प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. अवघ्या काही तासांमध्ये आयोध्येमधील राम मंदिरात प्रभू रामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यामुळे सध्या देशभरात राममय वातावरण झालं असून प्रत्येकाच्या ओठी रामस्तुतीची गीत ऐकू येत आहेत. यामध्येच 'राम आएंगे' हे गाणं तर सध्या चांगलं ट्रेंड होतंय. विशेष म्हणजे हेच गाणं AI ने चक्क दिवंगत गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला आहे. लता दीदींच्या आवाजातलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळेच जण थक्क झाले आहेत.
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन होऊन आता २ वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, त्यांच्या आवाजाची जादू आजही देशवासियांच्या मनावर आहे. त्यामुळे त्यांची असंख्य गाणी आजही श्रोते आवडीने ऐकतात. त्यामुळेच AI ने 'राम आएंगे' हे गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करुन लता दीदींना आदरांजली वाहिली आहे. सोबतच देशवासियांनाही थक्क केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर लतादीदींच्या आवाजातील 'राम आएंगे' हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. एका AI वापरकर्त्याने हा व्हिडीओ युट्यूबवर रिलीज केला आहे. AI आणि साऊंड इंजिनिअरिंगच्या मदतीने त्याने हा ऑडिओ तयार केल्याचं त्याने म्हटलं आहे. तसंच कोणत्याही आर्थिक लाभासाठी हा ऑडिओ तयार केला नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्याने संबंधित गायक, संगीतकार यांचा आदर ठेवून ही कृती तयार केली आहे.
The most appropriate use of AI so far... pic.twitter.com/ClkDSF9e6u
— Ranvijay Singh (@ranvijayT90) January 20, 2024
दरम्यान, राम आएंगे हे मूळ गाणं प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा यांनी गायलं आहे. त्यांच्या या गाण्याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केलं आहे.