Lata Mangeshkar यांचा प्रथम स्मृतीदिन; आपल्या मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:07 PM2023-02-06T18:07:53+5:302023-02-06T18:08:26+5:30

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांची गाणी आठवणी मात्र आजही रसिकांच्या मनात कायम आहेत.

Lata Mangeshkar's first anniversary; 'So much' wealth left behind, who is the heir now? | Lata Mangeshkar यांचा प्रथम स्मृतीदिन; आपल्या मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती

Lata Mangeshkar यांचा प्रथम स्मृतीदिन; आपल्या मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती

googlenewsNext

गाणसम्राज्ञी, गाणकोकीळा अशी कित्येक विशेषणं भुषवणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतिदिन. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची गाणी आठवणी मात्र आजही रसिकांच्या मनात कायम आहेत. लता मंगेशकर गेल्यानंतर त्यांचा गाण्यांचा खजिना तर रसिकांसाठी सोडून गेल्याच पण त्यांची कोट्यवधींची संपत्ती सुद्धा आहे.  लतादीदी गेल्यानंतर या संपत्तीचं काय झालं. तर याचा वारसदार कोण असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना आहेत. लता मंगेशकर यांना पहिल्या गाण्यासाठी मानधन मिळालं होतं ते होतं फक्त २५ रुपये. पण आपल्या मेहनतीने त्यांनी भरपूर संपत्ती कमावली.  आज त्यांची संपत्ती काही कोटींच्या घरात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती सुमारे ५ कोटी डॉलर्स इतकी आहे म्हणजेच अंदाजे ३६८ कोटी रुपये आहे. गाण्यांच्या रॉयल्टीतून आणि अन्य गुंतवणुकीतून त्यांची ही संपत्ती निर्माण झाली आहे. लतादीदींची नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्ती ३६८ कोटी रुपये आहे. लता मंगेशकर यांचे दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर प्रभु कुंज भवन नावाचे घर आहे. या घराची किंमत करोडोंमध्ये आहे. लता मंगेशकर या कारच्या शौकीन होत्या. त्यांच्याकडे शेवरलेट, ब्यूक आणि क्रायस्लर अशा अनेक शानदार कार्स होत्या.

Web Title: Lata Mangeshkar's first anniversary; 'So much' wealth left behind, who is the heir now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.