छोटा राजन असता तर नक्की बेड मिळाला असता...! नातेवाईकाच्या निधनानंतर इरफानची पत्नी संतापली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 05:13 PM2021-05-03T17:13:25+5:302021-05-03T17:15:07+5:30
दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापा सिकदर हिच्या एका नातेवाईकाला बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला. सुतापाने यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. रूग्णालयात बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, इंजेक्शन नाहीत, अशा स्थितीत रूग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. दिवंगत अभिनेता इरफान खानची (Irrfan Khan) पत्नी सुतापा सिकदर (Sutapa Sikdar ) हिच्या एका नातेवाईकालाही अशाच स्थितीतून जावे लागले आणि अखेर या नातेवाईकाला बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला. सुतापाने यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. (Sutapa Sikdar Post amid corona pandemic)
सुतापाची पोस्ट...
मी माझा नातेवाईक समीर बॅनर्जीच्या मदतीसाठी एका दिवसापूर्वी पोस्ट टाकली होती. आज ते आम्हाला सोडून गेलेत. आम्ही दिल्लीतील घरात आयसीयू लावू शकत नव्हतो आणि रूग्णालयात आम्हाला बेड मिळत नव्हता. मी समीर दांच्या चेह-यावरचे हास्य कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्यासाठी आयसीयू बेड मिळवू शकली नाही, हेही मी कधीच विसरू शकणार नाही. कारण तो छोटा राजन नव्हता, एक इमारदार माणूस होता... दिल्लीतील हे थैमान मी कधीही विसरू शकत नाही.तुम्ही पण विसरू नका की, अशा अनेक बॅनर्जी, शेख, दास आणि अदजानिया सारख्या कित्येकांना मरायचे आहे. आपण देशातील हिंदू आणि मुस्लिम सणांऐवजी देशातील हॉस्पिटल्स, ऑक्सिजन प्लान्ट्सवर जास्त लक्ष केंद्रित केले असते तर कदाचित समीर आमच्या सोबत आणखी थोडा काळ राहू शकले असते, अशा शब्दांत सुतापाने आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या या पोस्टमध्ये सुतापाने दिल्ली सरकार, मोदी यांना टॅग केले आहे.