कमल हासन व गौतमीचे १३ वर्षांचे ‘लिव्ह इन’ नाते तुटण्यामागे श्रुती नाही तर वेगळेच आहे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 06:50 AM2018-02-28T06:50:58+5:302018-02-28T12:22:15+5:30
अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री गौतमी या दोघांचे मार्ग वेगवेगळे झालेत पण याला कारणीभूत ठरलेले मतभेदांचे वादळ कदाचित अद्यापही ...
अ िनेता कमल हासन आणि अभिनेत्री गौतमी या दोघांचे मार्ग वेगवेगळे झालेत पण याला कारणीभूत ठरलेले मतभेदांचे वादळ कदाचित अद्यापही शांत झालेले नाही. सन २०१६ मध्ये गौतमी व कमल यांचे १३ वर्षांचे ‘लिव्ह इन’संबंध संपुष्टात आले होते. खुद्द गौतमीनेच तिच्या ब्लॉगवरून हे जाहिर केले होते. अर्थात हे सबंध संपुष्टात येण्यामागचे नेमके कारण गौतमीने स्पष्ट केले नव्हते. पण यासाठी कमल हासनची मुलगी श्रुती हासन हिला जबाबदार ठरवण्यात आले होते. श्रुतीमुळेच गौतमी व कमल यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यांचे १३ वर्षांचे लिव्ह इन रिलेशन संपुष्टात आले, अशी चर्चा होती. पण आता गौतमीनेच श्रुती यासगळ्यासाठी कारणीभूत नव्हती, असे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. गौतमीने एक ब्लॉग लिहून हे नाते तुटण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
कमल व माझे नाते तुटण्यामागे कुणीही तिसरी व्यक्ती जबाबदार नव्हती. नाही. विशेषत: श्रुती व अक्षरा तर अजिबात नाही. माझ्या व श्रुतीतील मतभेदांबाबत खूप काही लिहिले गेले. पण ते सत्य नाही. अक्षरा व श्रुती या दोघीही व्यक्ती म्हणून खूप चांगल्या आहेत. मी लहानपणापासून त्या दोघींना ओळखते. आजही मी त्यांच्यावर तितकीच प्रेम करते. माझे व कमलचे नाते तुटण्यामागे काही कारणीभूत ठरले असेल तर ते म्हणजे कमलने शब्दाला न जागणे. त्याचे ते वागणे तडजोड म्हणून स्वीकारायला मी तयार नसणे आणि आत्मसन्मान गहान न टाकणे हेच आमचे नाते तुटण्याचे खरे कारण आहे. कमल हासन निर्मित अनेक चित्रपटांसाठी मी कॉस्च्युम डिझाईनर म्हणून काम केले. पण मला या कामासाठी गृहीत धरले गेले. २०१६ पर्यंत ‘दशावतरम’ आणि ‘विश्वरूमप’ सारख्या चित्रपटांसाठी मला एक कवडीही दिली गेली नाही, असे गौतमीने लिहिले आहे.
मला जज करणाºयांना मी सांगू इच्छिते की, तुम्ही मला ३० वर्षांपासून ओळखता. आत्तापर्यंत मी काहीही बोलली नाही. पण आता मी बोलतेय. अर्थात मी कारणाशिवाय आणि पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे.
ALSO READ : कमल हासनच्या आयुष्यातील महिला...!
To all of those people who were so quick to judge me, you have known me for 30 years and I have never been one to throw my words around. When I say something about anyone, I do not speak without reason. And I do not speak without proof. https://t.co/hZLVULhcdu— Gautami (@gautamitads) February 27, 2018