'रामायणा'त सीतेची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, पाहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 04:03 PM2019-07-30T16:03:42+5:302019-07-30T16:14:07+5:30
८० च्या दशकात रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. या प्रत्येक व्यक्तिरेखा आणि ती साकारणा-या कलाकारांना आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. अरूण गोविल यांनी साकारलेला ‘राम’आणि दीपिका चिखलियाने साकारलेली ‘सीता’ आजही प्रेक्षकांना लख्ख आठवते.
८० च्या दशकात रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. या प्रत्येक व्यक्तिरेखा आणि ती साकारणा-या कलाकारांना आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. अरूण गोविल यांनी साकारलेला ‘राम’आणि दीपिका चिखलियाने साकारलेली ‘सीता’ आजही प्रेक्षकांना लख्ख आठवते. अनेक जण आजही अरूण गोविल यांना ‘राम’ तर दीपिका चिखलिया हिला ‘सीता’ म्हणूनच ओळखतात. लग्नानंतर दीपिकाने या चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि संसारात रमली. पण सोशल मीडियावर मात्र आजही ती अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
दीपिकाने ‘रामायण’मालिकेत काम करण्यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. भगवान दादा, रात के अंधेर में, खुदाई, सुन मेरी लैला, चीख, आशा ओ भालोबाशा (बंगाली) आणि नांगल (तामिळ) या सिनेमांमध्ये ती दिसली. यापैकी जास्तीत जास्त सिनेमे हे बी ग्रेड होते.
‘रामायण’ या मालिकेनंतर दीपिकाने नंतर ‘विक्रम वेताळ’, ‘लव कुश’ या मालिकांमध्येही काम केले. 1991 मध्ये ती राजकारणातही आली. ‘रामायण’मुळे मिळालेल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत त्यांनी 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. पण, काही वर्षांनी तिने राजकारणालाही रामराम ठोकला.
‘रामायण’ ही मालिका केली, तेव्हा दीपिका केवळ 16 वर्षांची होती. इतक्या कमी वयात दीपिकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण असे असले तरी तिचे अॅक्टिंग करिअर फार काळ चालले नाही.
दीपिकाने कॉस्मॅटिक कंपनीचा मालक हेमंत टोपीवालाशह लग्न केले असून, त्यांना निधी आणि जुही या दोन मुली आहेत.
सध्या दीपिका पतीचा कॉस्मेटिक बिझनेस सांभाळते. पतीच्या कंपनीच्या रिसर्च व मार्केटींग टीमला ती हेड करते.