Latest Update : दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही; डायलिसिसची गरज !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 08:31 AM2017-08-05T08:31:31+5:302017-08-05T14:01:31+5:30

गेल्या चार दिवसांपासून लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. ...

Latest Update: Dilip Kumar's condition is not improved; Need Dialysis! | Latest Update : दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही; डायलिसिसची गरज !

Latest Update : दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही; डायलिसिसची गरज !

googlenewsNext
ल्या चार दिवसांपासून लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. क्षणाक्षणाला त्यांची प्रकृती खालवत असल्याने डॉक्टरांची संपूर्ण टीमच त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, त्यांना ‘डायलिसिस’ करण्याची गरज भासू शकते, अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. 

गेल्या बुधवारी त्यांची तब्येत अचानकच खराब झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. किडनीचा त्रास वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. गुरुवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणाही झाली होती. त्यामुळे त्यांना स्पेशल रूममध्ये हलविण्यात आले होते. परंतु पुन्हा सायंकाळी प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये उपचार घेतानाचे त्यांचे फोटोज त्यांच्या पुतणीने सोशल मीडियावर शेअरही केले होते. 

Yusuf uncle right now in Leelavati. Please do not believe people who are seeking publicity via a vis wrong information. pic.twitter.com/ocVY2mfwFk— Shaheen (@ShhaheenAhmeed) August 4, 2017 ">http://

}}}}
लीलावती रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरने याविषयी माहिती देताना म्हटले की, दिलीपकुमार यांची किडनी व्यवस्थितरीत्या काम करत नाही. ज्यामुळे त्यांची प्रकृतीत सातत्याने खालावत आहे. यावेळी त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले नाही. लीलावती रुग्णालयाचे उपाध्यक्ष अजयकुमार पांडे यांनी सांगितले की, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून असून, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. 

या अगोदर दिलीपकुमार यांना गेल्या डिसेंबर महिन्यात लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या पायाला सूज आली होती. उपचारानंतर लगेचच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. आता किडनी आणि डिहायड्रेशनच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे. 

Web Title: Latest Update: Dilip Kumar's condition is not improved; Need Dialysis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.