भारती सिंहने ठेवलंय बाळाचं 'हे' क्युट नाव; तुम्हाला माहितीये का ज्युनिअर लिंबाचियाचं निकनेम?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 05:36 PM2022-04-20T17:36:13+5:302022-04-20T17:36:56+5:30

Bharti Singh: काही दिवसांपूर्वीच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे या बाळाचं टोपणनाव भारतीने ठेवलं असून तेदेखील मजेशीर असल्याचं पाहायला मिळतं.

laughter queen Bharti Singh baby nickname | भारती सिंहने ठेवलंय बाळाचं 'हे' क्युट नाव; तुम्हाला माहितीये का ज्युनिअर लिंबाचियाचं निकनेम?

भारती सिंहने ठेवलंय बाळाचं 'हे' क्युट नाव; तुम्हाला माहितीये का ज्युनिअर लिंबाचियाचं निकनेम?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध लाफ्टर क्वीन या नावाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी कॉमेडियन म्हणजे भारती सिंह (bharti singh). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर भारतीने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यामुळे तिच्या विषयीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे या बाळाचं टोपणनाव भारतीने ठेवलं असून तेदेखील मजेशीर असल्याचं पाहायला मिळतं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली भारती तिच्या युट्यूब चॅनेलवर दररोज व्हिडीओ अपलोड करत असते. यात प्रेग्नंसी काळापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत तिने अनेक daily vlog शेअर केले आहेत. यात बाळाचा जन्म झाल्यानंतरही तिने काही व्हिडीओ अपलोड केल्याचं पाहायला मिळतं.

भारतीने बाळाचा जन्म झाल्यापासून त्याच्याशी संबंधित अनेक व्हिडीओ शूट केले आहेत. या व्हिडीओमध्ये अद्यापही तिने बाळाचा चेहरा नेटकऱ्यांना दाखवला नाही. तसंच बाळाचं नाव काय ठेवणार हेदेखील ठरवलेलं नाही. मात्र, सध्या ती बाळाला ज्या टोपणनावाने हाक मारते ते तिने सांगितलं आहे.

दरम्यान, भारतीने तिच्या बाळाचं गोला हे टोपणनाव ठेवलं आहे. भारतीचं बाळ तिच्यासारखंच छान गुबगुबीत, गोड असल्यामुळे तिने त्याचं नाव गोला ठेवलं आहे. भारती तिच्या प्रत्येक vlog मध्ये बाळाचा उल्लेख करताना गोला या नावाचा उल्लेख करते. त्यामुळे तिच्या बाळाचं निकनेम आता सगळ्यांना ठावूक झालं आहे.
 

Web Title: laughter queen Bharti Singh baby nickname

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.