‘मलंग’ चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच; मोहित सुरीने केला शेअर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 17:05 IST2019-11-17T17:05:03+5:302019-11-17T17:05:38+5:30
नुकताच ‘मलंग’ या आगामी हिंदी चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच झाल्याचे समजतेय. या चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सुरी याने फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘मलंग’ चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच; मोहित सुरीने केला शेअर!
बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपटांचे वारे आता वाहू लागले आहे. असाच एक बिगबजेट चित्रपट म्हणजे ‘मलंग’. नुकताच ‘मलंग’ या आगामी हिंदी चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच झाल्याचे समजतेय. या चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सुरी याने फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री दिशा पाटनी ही जोडी प्रथमच ‘मलंग’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ही जोडी प्रेक्षकांना किती पसंत पडतेय, ते कळेलच.
मोहित सुरी हा बॉलिवूडचा असा दिग्दर्शक आहे जो नेहमी वेगवेगळे प्रयोग करतो. नव्या थीमसह चित्रपट बनवतो. आता ‘मलंग’ मधून पण अशीच एक हटके लव्हस्टोरी पाहायला मिळणार, यात काही शंका नाही. आदित्य रॉय कपूरच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक मोहित सुरीने त्याला हा फर्स्ट लूक लाँच करून जणू काही गिफ्टच दिले आहे. आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी हे दोन्ही कलाकार बॉलिवूडचे सध्याच्या उत्कृ ष्ट कलाकारांपैकी एक मानले जातात. ते प्रथमच एकत्र काम करताना दिसत आहेत.