रियाचे वडील सुशांतला औषधे का द्यायचे ?, सुशांतच्या वकीलांनी उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 16:49 IST2020-08-24T16:43:43+5:302020-08-24T16:49:42+5:30
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात सतत रिया चक्रवर्तीवर प्रश्न उपस्थित होतायते.

रियाचे वडील सुशांतला औषधे का द्यायचे ?, सुशांतच्या वकीलांनी उपस्थित केला प्रश्न
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात सतत रिया चक्रवर्तीवर प्रश्न उपस्थित होतायते. गेल्या तीन दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सीबीआय करतेय. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सुशांतचे फॅमिली वकील विकास सिंग यांनी पुन्हा एकदा रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विकास सिंह म्हणतात रियाच्या वडिलांनी सुशांतला औषधे कशी दिली? त्याचसोबत रियाच्या घरातून येणाऱ्या जेवण्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले.
एका मुलाखती दरम्यान विकास सिंग म्हणाले, नक्कीच काही तरी गडबड आहे. रियाच्या वडिलांनी कुटुंबातील कोणालाही औषधे दिली नाहीत.रियाचे वडील मिलिटरी डॉक्टर होते आणि स्पेशलाइज्ड नव्हते. रियाने ज्या प्रकारे सांगितले की तिने मानसोपचार तज्ञांशी सल्लामसलत केली होती, मग रियाच्या वडिलांनी सुशांतला औषधे कशी दिली? रिया सुशांतसोबत लिव्ह-इनमध्ये रहायची तर रियाच्या घरातून जेवण का यायचे. या जेवणात नक्की काय मिक्स केले जायचे असा प्रश्न आहे. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाच्या चौकशीसाठी सीबीआयने त्यांना समन्स बजावला आहे. सुशांतच्या जवळच्या मित्रांची चौकशी करण्यात आली आहे. आता प्रकरणात आणखीन एक नवीन नाव समोर आले आहे. ज्याची सीबीआय चौकशी करणार आहे.