Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल!
By अमित इंगोले | Published: October 17, 2020 02:51 PM2020-10-17T14:51:10+5:302020-10-17T14:57:40+5:30
आता यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सिनेमाचा दिग्दर्शक राघव लॉरेन्स समोर आला आहे आणि त्याने सांगितलं आहे की, त्याने तमिळमधील ओरिजिनल सिनेमा 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव बदलून 'लक्ष्मी बॉम्ब' का ठेवलं.
अक्षय कुमार याच्या आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमावरून वाद सुरू झाला आहे. काही लोक सोशल मीडियातून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहे. काही लोकांचा आरोप आहे की, या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे. तर काही लोकांनी सिनेमाचं टायटल 'लक्ष्मी बॉम्ब' वर आक्षेप घेतला आहे. त्यांच्यानुसार, हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे. आता यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सिनेमाचा दिग्दर्शक राघव लॉरेन्स समोर आला आहे आणि त्याने सांगितलं आहे की, त्याने तमिळमधील ओरिजिनल सिनेमा 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव बदलून 'लक्ष्मी बॉम्ब' का ठेवलं.
सिनेमाच्या टायटलबाबत बोलताना राघव लॉरेन्स म्हणाला की, 'आमच्या तमिळ सिनेमाचं मुख्य कॅरेक्टर कंचना होतं. कंचनाचा अर्थ सोनं होतो जे स्वत: लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं. आधी आमही हिंदीतही तेच तमिळसारखंच टायटल ठेवणार होतो. पण नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाव बदललं जेणेकरून हिंदी ऑडिअन्सना अपील करू शकू. मग यासाठी 'लक्ष्मी बॉम्ब' पेक्षा चांगलं आणखी काय असू शकलं असतं'.(अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी)
राघव पुढे म्हणाला की, 'देवाच्या कृपेने हे कॅरेक्टर सिनेमात धमाक्यासारखा येतं. त्यामुळे आम्ही हिंदी सिनेमाचं नाव 'लक्ष्मी बॉम्ब'असं ठेवलं. ज्याप्रमाणे लक्ष्मीचा धमाका कधी मिस होत नाही त्याचप्रमाणे या सिनेमातील मुख्य भूमिकाही एक ट्रान्सजेंडर आहे आणि तो शक्तिशाली आहे. त्यामुळे हे टायटल आमच्या सिनेमासाठी पूर्णपणे योग्य आहे'.
'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तो यात आसिफ आणि लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसेल. अक्षयसोबतच या सिनेमात मुख्य भूमिकेत कियारा अडवाणी दिसणार आहे. हा हॉरर-कॉमेडी सिनेमा ९ नोव्हेंबर २०२० ला डिज्ने प्लस हॉटस्टारवर ऑनलाइन रिलीज होणार आहे.