प्रतिक्षा संपली ! बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर आला समोर, अक्षय कुमारचा पहिल्यांदाच पाहायला मिळणार हटके अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 13:15 IST2020-10-09T13:11:55+5:302020-10-09T13:15:09+5:30
अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

प्रतिक्षा संपली ! बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर आला समोर, अक्षय कुमारचा पहिल्यांदाच पाहायला मिळणार हटके अंदाज
अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट यंदा दिवाळीनिमित्ताने रसिकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची जोरदार चर्चा होती. आज सिनेमाचा ट्रेलरही समोर आला आहे. अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच तुफान पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळतंय.
Jahan kahi bhi hain, wahi ruk jaayyein aur taiyyaar ho jaayyein dekhne #LaxmmiBomb ka trailer, kyunki barasne aa rahi hai Laxmmi! #LaxmmiBombTrailer out now. #YeDiwaliLaxmmiBombWali! 💥
— Akshay Kumar (@akshaykumar) October 9, 2020
#FoxStarStudios#DisneyPlusHotstarMultiplex@advani_kiara@offl_Lawrencepic.twitter.com/oJM6YljkBX
अक्षय कुमारनेही ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर करत त्याने म्हटले आहे की. 'लक्ष्मी बॉम्ब ऑफिशियल ट्रेलर, तुम्ही जिथे असाल तिथे थांबा आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यास सज्ज व्हा, ट्रेलर भयानक आणि कॉमेडीने परिपूर्ण आहे. ट्रेलर कसा वाटला ? असेही त्याने चाहत्यांना विचारले आहे.
ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची कथेचा अंदाज येतो. चित्रपटात अक्षय एका व्यक्तीच्या भूमिकेत आहे जो भूतांना घाबरतो पण नंतर असे काही घडते की, ट्रान्सजेंडरचा आत्मा त्याच्या शरीरात शिरतो. ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचा एक डायलॉग आहे, ''ज्या दिवशी भूत माझ्यासमोर येईल, त्या दिवशी मी बांगड्या घालेन.'' त्यानुसार त्याचा बदलत गेलेला अंदाज पाहायला मिळतो.
मुलींप्रमाणे देहबोली असणे, मुलींप्रमाणेच हावभाव करत बोलणे अशा अंदाजाl अक्षय कुमार दिसतो. अक्षय कुमार त्याची मैत्रिण कियारा अडवाणीच्या आई वडिलांसोबत राहतो. या घरातच भूतांचा वास असल्याचे जाणवू लागते. ट्रेलरमधील अक्षयचे काही सीन इतके धडकी भरवणारे आहेत. काही क्षण तुमचाही थरकाप नाही उडाला तर नवलच.
भारतात नाही तर 'या' देशांमधील सिनेमागृहात 'लक्ष्मी बॉम्ब' होणार रिलीज
अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल. सिने समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर याची माहिती दिली. तर भारतातील लोक ९ नोव्हेंबरलाच हा सिनेमा डीज्नी हॉटस्टारवर बघू शकणार आहेत. अक्षय कुमार या सिनेमातून पहिल्यांदाच एका किन्नरची भूमिका साकारणार आहे. अशात त्याचा हा एक्सपरिमेंट प्रेक्षकांना किती भावतो, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी आणि तुषार कपूरही दिसणार आहे. कोरोना काळात सोशल मीडियातून या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं.