‘लक्ष्मी बॉम्ब’साठी अक्षय कुमारची पुन्हा तीच खेळी, पुन्हा झाला टीकेचा धनी

By रूपाली मुधोळकर | Published: October 19, 2020 02:16 PM2020-10-19T14:16:39+5:302020-10-19T14:18:19+5:30

नुकताच ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर रिलीज झाला आणि पाठोपाठ काल या सिनेमाचे पहिले गाणे ‘बुर्ज खलीफा’ रिलीज झाले. पण ट्रेलर रिलीजवरून वाद झाला तसाच या गाण्याच्या रिलीजवरूनही झाला.

laxxmi bomb song burj khalifa released but akshay kumar trolled due to hide like dislik button | ‘लक्ष्मी बॉम्ब’साठी अक्षय कुमारची पुन्हा तीच खेळी, पुन्हा झाला टीकेचा धनी

‘लक्ष्मी बॉम्ब’साठी अक्षय कुमारची पुन्हा तीच खेळी, पुन्हा झाला टीकेचा धनी

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

अक्षय कुमारचालक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि पाठोपाठ काल या सिनेमाचे पहिले गाणे ‘बुर्ज खलीफा’ रिलीज झाले. पण ट्रेलर रिलीजवरून वाद झाला तसाच या गाण्याच्या रिलीजवरूनही झाला. हे गाणे रिलीज करतानाही अक्षयने लाईक व डिसलाईकचे ऑप्शन गायब करवले. मग काय, चाहते पुन्हा एकदा भडकले. बॉलिवूडचा सर्वाधिक भित्रा अभिनेता, असे काय काय युजर्सनी त्याला सुनावले.
याआधी ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज झाला त्यावेळीही अक्षयने लाईक व डिसलाईकचे ऑप्शन गायब केले होते. यामुळे ट्रेलरला किती लाईक्स आणि डिसलाईक्स मिळाले, हे कळायला मार्ग उरला नव्हता.

सुशांत सिंग राजपूतची कथित आत्महत्या, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण शिवाय घराणेशाही या मुद्यांवरून सध्या बॉलिवूड कलाकारांना प्रचंड ट्रोल केले जातेय. सेलिब्रिटींच्या सिनेमांनाही लक्ष्य केले जातेय. आलिया भटचा ‘सडक 2’ आणि अनन्या पांडेच्या ‘खाली पिली’ या दोन्ही सिनेमांच्या ट्रेलरवर नेटक-यांनी डिसलाईक्सच्या भडीमार केला होता. यापासून वाचण्यासाठी ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या मेकर्सनी ट्रेलर रिलीज करताना खेळी केली आणि लाईक व डिसलाईकचे आॅप्शनच युट्यूबवरून ‘हाईड’ केले. यावरून अक्षय प्रचंड ट्रोल झाला होता.

मात्र आता ‘लक्ष्मी बॉम्ब’चे पहिले गाणे प्रदर्शित करतानाही मेकर्सनी पुन्हा हीच खेळी खेळली. यामुळे चाहते पुन्हा संतापले. त्याच्याच प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत आणि लोक अक्षयला ट्रोल करत आहेत.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.   येत्या दिवाळीमध्ये ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी

अक्षय कुमार याच्या आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमावरून वाद सुरू झाला आहे. काही लोक सोशल मीडियातून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहे. काही लोकांचा आरोप आहे की, या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे. तर काही लोकांनी टायटल 'लक्ष्मी बॉम्ब' वर आक्षेप घेतला आहे. त्यांच्यानुसार, हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे.  

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी

अक्षयचं गाणं रिलीजपूर्वीच डिसलाईक, 'बुर्ज खलिफा'वर मिम्स

Web Title: laxxmi bomb song burj khalifa released but akshay kumar trolled due to hide like dislik button

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.