सुप्रसिद्ध कन्नड निर्माते रामू यांचे कोरोनामुळे निधन, ‘कोटी रामू’ नावाने झाले होते लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:02 AM2021-04-27T11:02:00+5:302021-04-27T11:15:35+5:30
Kannada film producer Ramu dies of Covid : आठवड्यापूर्वी त्यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. तीन दिवसांपूर्वीच त्यांना एका खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले होते.
कोरोनाने मनोरंजन विश्वातील आणखी एक बळी घेतला. कन्नड सिनेमसृष्टीतील दिग्गज निर्माते रामू (Ramu) यांचे कोरोनामुळे निधन झाले. 52 वर्षांच्या रामू यांनी सोमवारी संध्याकाळी बेंगळुरू येथे अंतिम श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी मालाश्री व दोन मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
कन्नड सिनेइंडस्ट्रीतील दिग्गजांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. (Leading Kannada film producer Ramu dies of Covid)
Sandalwood got to witness a shocking news on Monday evening as noted Kannada film producer Ramu succumbed to Covid-19. He was being treated at M S Ramaiah Hospital in Bengaluru, where he breathed his last. Ramu was married to Kannada film Star Malashree. They have two children. pic.twitter.com/akjp6HlYyj
— BARaju (@baraju_SuperHit) April 26, 2021
एक आठवड्यापूर्वी त्यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. तीन दिवसांपूर्वीच त्यांना एका खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले होते.
Most passionate producer of our industry Ramu sir has left us 🥺
— Harshika Poonacha (@actressharshika) April 26, 2021
Rest in Peace sir🙏
Please stop killing innocent lives #Covid 😡😡😡 pic.twitter.com/i20B9KM9vA
चित्रपट वितरक म्हणून रामू यांनी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले होते. रामू एन्टरप्रायजेस या बॅनरखाली त्यांनी 30 पेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांचे बहुतांश सिनेमे बिजेट सिनेमे होते. कन्नडमध्ये त्यांनी कोट्यवधी रूपयांच्या बजेटचे सिनेमे बनवलेत. त्यामुळे त्यांना ‘कोटी रामू’ या नावानेही ओळखले जात होते. त्यांच्या नावावर सिनेमे चालत. गोलीबारी, एके 47, सिम्हाद असे अनेक सिनेमे त्यांनी प्रोड्यूस केले होते़.
रामू यांनी कन्नड फिल्म सुपरस्टार मालाश्रीसोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत.