​जाणून घ्या, ‘मुन्ना मायकल’ अन् ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ची दोन दिवसांची बॉक्सआॅफिस कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2017 10:28 AM2017-07-23T10:28:25+5:302017-07-23T15:58:25+5:30

टायगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ गत शुक्रवारी रिलीज झाला. टायगरच्या या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा होत्या.  चित्रपटाचा ट्रेलर, प्रमो सगळेच लोकांना ...

Learn, 'Munna Michael' and 'Lipstick Under My Burca' box office earn two days! | ​जाणून घ्या, ‘मुन्ना मायकल’ अन् ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ची दोन दिवसांची बॉक्सआॅफिस कमाई!

​जाणून घ्या, ‘मुन्ना मायकल’ अन् ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ची दोन दिवसांची बॉक्सआॅफिस कमाई!

googlenewsNext
यगर श्रॉफचा ‘मुन्ना मायकल’ गत शुक्रवारी रिलीज झाला. टायगरच्या या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा होत्या.  चित्रपटाचा ट्रेलर, प्रमो सगळेच लोकांना आवडले होते. साहजिकच ‘हिरोपंती’ व ‘बागी’प्रमाणेच हा चित्रपटही कमाल करेल, असे वाटले होते. पण  चित्रपट समीक्षकांना फार भावला नाहीच. प्रेक्षकांनीही चित्रपटाकडे पाठ फिरवली. मग काय,चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईने निर्मात्यांची निराशा केली. चित्रपटाला अपेक्षेनुसार ओपनिंग मिळू शकली नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ ६.६५ कोटी रूपयांचा बिझनेस केला. दुसºया दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपट चांगली उसळी घेईल, अशी अपेक्षाही पाण्यात गेली. पण दुस-या दिवशी चित्रपटाने आणखीच निराशा केली. कारण कमाईचा आकडा पहिल्या दिवसांपेक्षाही खाली गेला. दुसºया दिवशी टायगरच्या या चित्रपटाने केवळ ६. १५ कोटींचा गल्ला जमवला. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवस चित्रपटाने एकूण १२.८० कोटी रूपयांचा व्यवसाय केला.

याऊलट ‘मुन्ना मायकल’सोबतच रिलीज झालेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ या चित्रपटाची संथ सुरुवात झाली. पण दुसºया दिवशी चित्रपटाने उसळी घेतली. पहिल्या दिवशी चित्रपटाने १.२२ कोटींचा बिझनेस केला. पण दुसºया दिवशी अचानक कमाईचा आकडा वाढला. शनिवारी चित्रपटाने २.१७ कोटी कमावले. 

‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट देशभरातील एकूण ३००० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. याऊलट ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ एकूण ४०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. खरे तर ‘मुन्ना मायकल’ व ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ दोन्ही चित्रपटांचे प्रेक्षक वेगवेगळे आहेत. त्यामुळे दोन्ही चित्रपटांची तुलना केली जाऊ शकत नाही. पण तरिही ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली, असे म्हणता येईलच. एका बोल्ड विषयाला वाहिलेला पण समाजाच्या डोळ्यांत झळझळीत अंजन घालणाºया चित्रपटाला दुसºया दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणे, यातच सगळे काही आले.

Web Title: Learn, 'Munna Michael' and 'Lipstick Under My Burca' box office earn two days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.