​जाणून घ्या कास्टिंग काऊचबद्दल काय सांगतेय दिव्या दत्ता...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 11:55 AM2018-04-28T11:55:59+5:302018-04-28T17:25:59+5:30

कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे सध्या मीडियात गाजत आहेत. धग या मराठी चित्रपटामुळे उषा जाधव प्रकाशझोतात आली. या चित्रपटासाठी तिला ...

Learn what Divine Dutta tells us about Casting Cowwatch ... | ​जाणून घ्या कास्टिंग काऊचबद्दल काय सांगतेय दिव्या दत्ता...

​जाणून घ्या कास्टिंग काऊचबद्दल काय सांगतेय दिव्या दत्ता...

googlenewsNext
स्टिंग काऊचची अनेक प्रकरणे सध्या मीडियात गाजत आहेत. धग या मराठी चित्रपटामुळे उषा जाधव प्रकाशझोतात आली. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. उषाने काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. तिला देखील कास्टिंग काऊचचा सामना कारावा लागला होता असे तिने नुकतेच म्हटले आहे. आज बॉलिवूड, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री समोर येऊन कास्टिंग काऊंचबद्दल बोलत आहेत. बॉलिवूडमध्ये तर कास्टिंग काऊच मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असेच म्हटले जाते. दिव्या दत्ता गेली अनेक वर्षं बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग आहे. नुकतेच दिव्याला तिच्या इरादा या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. दिव्याच्या कुटुंबातील कोणीही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नव्हते. पण तरीही तिने तिच्या अभिनयाच्या आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. कास्टिंग काऊचबाबत दिव्याला विचारले असता ती सांगते, अभिनय असो अथवा कोणतेही क्षेत्र असो तुम्हाला त्या क्षेत्रात अनेक संधी असतात. या संधी कशा मिळवायच्या या प्रत्येकाने ठरवायचे असते. तसेच प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट दोन्ही लोक असतात. त्याप्रमाणे ते फिल्म इंडस्ट्रीत देखील आहेत. काही लोक केवळ आपल्या कामात रमणारे असतात तर काही इतरांचे शोषण करणारे असतात. त्यामुळे तुम्ही त्या लोकांशी कसे वागायचे हे तुमचे तुम्ही ठरवायचे असते. काही वेळा कलाकाराला देखील गरज असल्याने ते या जाळ्यात ओढले जातात, निमूटपणे सगळे सहन करतात. पण याविषयी बोलायचे की नाही हे देखील तुम्ही तुमचे ठरवावे असे मला वाटते. आज आपल्या देशात लहान मुलींसोबत अतिशय वाईट कृत्य घडत आहेत. कास्टिंग काऊचच्या बाबतीत तर समोरच्या कलाकाराकडे तुम्हाला ती गोष्ट निवडायची की नाही ही चाॅईस असते. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात काय आणि कसे हवे आहे हे तुम्ही तुमचे निवडायचे असते. पण त्या लहान मुलींच्या बाबतीत तसे काहीही नाहीये. त्यामुळे कास्टिंग काऊचपेक्षा देखील लहान मुलांवर होणार अत्याचार ही गोष्ट अधिक वाईट आहे असे मला वाटते. एक इंस्ट्रीचा भाग म्हणून मी एवढेच करू शकते की, जे काही चुकीचे सुरू आहे, त्यावर बोलणे गरजेचे आहे असेच इतरांना सांगू शकते. 

Also Read : अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Web Title: Learn what Divine Dutta tells us about Casting Cowwatch ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.