मुलाला जन्म दिल्याच्या 6 तासानंतरच अभिनेत्रीचा झाला होता मृत्यु, आज मुलगाही आहे प्रसिद्ध अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:20 PM2020-09-18T15:20:38+5:302020-09-18T15:21:07+5:30
राजबब्बर विवाहीत असूनही स्मिताने त्यांच्याशी लग्न केले. म्हणून स्मिताला ‘घर फोडणारी महिला’ ठरवण्यात आले.
पडद्यावर गंभीर दिसणारी स्मिता पाटील ख-या आयुष्यात कमालीची खोडकर होती. सिनेमांमध्ये येण्या आधी स्मिता दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदिका होती. वृत्तनिवेदिका म्हणून साडी नेसणे बंधनकारक होते. पण स्मिताला जीन्स आवडायची. मग ती जीन्सवरच साडी नेसायची. श्याम बेनेगल यांनी तिच्यातील प्रतिभा हेरली आणि बॉलिवूडच्या एका प्रतिभाशाली अभिनेत्रीचा जन्म झाला.
१९७२ साली स्मिता टेलिव्हिजनवर दिसली त्यावेळी ती केवळ १७-१८ वर्षांची होती. १९७५ मध्ये श्याम बेनेगल यांनी ‘चरणदास चोर’ या सिनेमासाठी स्मिताला साईन केले आणि या सिनेमाने स्मिताला ख-या अर्थाने स्टार बनवले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. विसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या स्मिताने ७५ सिनेमे केलेत. निधनानंतर तिचे १४ सिनेमे रिलीज झाले होते.
स्मिता यांचे राज बब्बर यांच्यासोबतही नाते फार चांगले नव्हते.
राजबब्बर विवाहीत असूनही स्मिताने त्यांच्याशी लग्न केले. म्हणून स्मिताला ‘घर फोडणारी महिला’ ठरवण्यात आले. या टीकेने स्मिता आतून खचली होती. इतकी की, तिच्या संवेदनशील मनावर झालेले जखमा परत कधीच भरल्या गेले नाही. सेटवर नेहमी आनंदी, उत्साही राहणारी स्मिता लग्नानंतर अचानक शांत झाली होती.
स्मिता यांचे राज बब्बर यांच्यासोबतही नाते फार चांगले नव्हते. त्यांना एकाकीपणाचाही कंटाळा आला होता. अनेकदा राज बब्बरशी असलेले लग्न मोडून बाहेर पडण्याचा विचारही तिच्या मनात आला होता. अर्थात स्मिताने असे काही केले नाही. पण नियतीने मात्र हा विचार नेमका अमलात आणला.
राज बब्बर यांच्या आयुष्यातून स्मिताने कायमची एक्झिट घेतली.
13 डिसेंबर 1986 साली मुलगा प्रतिकच्या जन्माच्या काही तासातच त्यांचा मृत्यू झाला होता. स्मिता यांना वायरल इन्फेक्शन जास्त झाल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. प्रतिकचा जन्म झाल्यानंतर त्या घरी आल्या आणि इन्फेक्शन वाढल्यावरही त्यांनी प्रतिकला न सोडता हॉस्पीटलमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचा असा अकाली मृत्यू झाला. राज बब्बर यांच्या आयुष्यातून स्मिताने कायमची एक्झिट घेतली.
सशक्त अभिनयाने स्मिता यांनी फार कमी कालावधीत चित्रपचसृष्टीत आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते.स्मिता पाटील यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये 80 हिंदी आणि मराठी सिनेमात काम केले. त्यात 'निशान्त', 'चक्र', 'मंथन', 'भूमिका', 'गमन', 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्थ', 'बाज़ार', 'मंडी', 'मि