जाणून घेऊया... विनोद खन्ना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 07:26 AM2017-04-27T07:26:33+5:302017-04-27T12:56:33+5:30
विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946ला पेशावर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यवसायिक होते. त्यांच्या जन्माच्या ...
व नोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946ला पेशावर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यवसायिक होते. त्यांच्या जन्माच्या काहीच वर्षांत भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे काही शिक्षण मुंबई, दिल्ली आणि नाशिकमध्ये झाले. शिक्षण घेत असतानाच ते मुघल-ए-आझम, सोलवा साल यांसारख्या चित्रपटांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी अभिनयात करियर करण्याचे ठरवले.
सुनील दत्त यांच्या मन का मीत या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्या चित्रपटात त्यांनी एका खलनायकाची भूमिका साकारली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी खलनायकाच्या आणि सहकलाकाराच्या भूमिका साकारल्या. पूरब और पश्चिम, आन मिलो सजना, सच्चा झुठा या चित्रपटात त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. हम तुम और हो या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा नायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते मेरे अपने या चित्रपटात झळकले. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची जोडी अधिक गाजली. मुक्कदर का सिकंदर, परवरिश, हेरा फेरी, अमर अकबर एन्थॉनी असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्याकाळात त्यांना अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ यांच्यापेक्षा अधिक मानधान मिळत असेदेखील म्हटले जाते.
विनोद खन्ना यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीनंतर राजकारणात प्रवेश केला. त्यांनी 1999मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पंजाबमध्ये निवडणूक लढवली आणि त्यांनी विजय मिळवला. त्यांनी नुकतेच दिलवाले, दबंग 2 यांसारख्या चित्रपटांमध्येदेखील काम केले होते.
विनोद खन्ना यांची मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
आणखी वाचा ः विनोद खन्ना यांचे निधन