आमच्यावर उपकार कर, शूटींग बंद कर...! होळीच्या दिवशी अक्षय कुमारला युजर्सचे जशास तसे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 02:07 PM2021-03-29T14:07:06+5:302021-03-29T14:26:00+5:30

अक्षयने एक ट्विट केले आणि सोशल मीडिया युजर्सनी त्याला फैलावर घेतले. जाणून घ्या काय आहे भानगड?

lets not play holi, Akshay Kumar trollfor his tweet | आमच्यावर उपकार कर, शूटींग बंद कर...! होळीच्या दिवशी अक्षय कुमारला युजर्सचे जशास तसे उत्तर

आमच्यावर उपकार कर, शूटींग बंद कर...! होळीच्या दिवशी अक्षय कुमारला युजर्सचे जशास तसे उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षयच्या वर्कफ्रंबद्दल सांगायचे तर, अक्षय सध्या अनेक चित्रपटांत बिझी आहे. 

होळीच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. पण म्हणून लोकांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. कदाचित म्हणूनच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने दिलेला सल्ला लोकांच्या पचनी पडला नाही.याची परिणीती काय तर अक्षय सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतोय. होय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्षयने एक ट्विट केले आणि सोशल मीडिया युजर्सनी त्याला फैलावर घेतले.

अक्षयचे ट्विट


कोरोनाचा धोका बघता होळीचा सण आपआपल्या घरात राहून साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. याच पार्श्वभूमीवर अक्षयने आज एक ट्विट केले. माझ्यावर एक उपकार करा, प्लीज आज होळी साजरी करू नका. तुमच्या आणि तुमच्या आप्तांच्या सुरक्षेसाठी होळी घरात साजरी करा. तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा, अशा आशयाचे ट्विट अक्कीने केले आणि या ट्विटनंतर लोकांनी त्याला ट्रोल करणे सुरु केले.

आमच्यावर कृपा कर, शूटींग करू नकोस...


माझ्यावर एक उपकार करा, होळी खेळू नका..., असे अक्षयने लिहिताच सोशल मीडिया युजर्सनी त्याला त्याच्याच शब्दांत उत्तर दिले. आमच्यावर एक उपकार कर, चित्रपटाचे शूटींग करू नकोस. तुझ्या आणि तुझ्या आप्तांच्या सुरक्षेसाठी घरातच शूटींग कर, हॅपी होली, असे एका युजरने लिहिले.

अन्य एका युजरने अक्षयला अशाच पद्धतीने ट्रोल केले. होळीच्या दिवशी प्रेम वाटा, ज्ञान नाही, असे या युजरने लिहिले.

अक्षयच्या वर्कफ्रंबद्दल सांगायचे तर, अक्षय सध्या अनेक चित्रपटांत बिझी आहे. सूर्यवंशी, बेलबॉटम, अतरंगी रे, पृथ्वीराज असे त्याचे अनेक सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

Web Title: lets not play holi, Akshay Kumar trollfor his tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.