एका अपघातानंतर रातोरात बदललं 'आशिकी' फेम अभिनेत्रीचं आयुष्य; आता दिसते अशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 04:44 PM2022-01-11T16:44:52+5:302022-01-11T16:45:29+5:30
१९९९ मध्ये झालेल्या एका भीषण अपघाताने या अभिनेत्रीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले.
तुम्हाला अभिनेत्री अनु अग्रवाल ( Anu Agarwal) आठवते का? तीच अनु अग्रवाल, जिच्या निरागस आणि आकर्षक अभिनयाने 'आशिकी' (Aashiqui) चित्रपटात सर्वांची मने लुटली. आज ११ जानेवारीला अनु अग्रवालचा वाढदिवस असतो. १९९० मध्ये आशिकी या चित्रपटाद्वारे अनु अग्रवाल रातोरात स्टार बनली. पण अनुला तिच्या पदार्पणात जे यश मिळालं, ते इतर कोणत्याही चित्रपटात मिळू शकले नाही.
अनु अग्रवालने हॉलिवूडमध्ये काम केले असले तरी १९९९ मध्ये झालेल्या एका भीषण अपघाताने अनु अग्रवालचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. २०२१ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, माझा १९९९ मध्ये मोठा अपघात झाला होता, या अपघातानंतर मी कोमामध्ये गेलो. मी अपघातापूर्वी आश्रमात राहत होते, जिथे मी जीवनाच्या अध्यात्माकडे लक्ष देत होते. अपघातानंतर काय घडले हे मला आठवत नाही. पण मला माझं नाव आठवलं. 2001च्या सुमारास, मी या प्रपंचातून निवृत्त झाले आणि माझे केस देखील मुंडण केले. त्यानंतर मी शांत ठिकाणी ध्यान करणे सुरू केले."
या मुलाखतीत अनुने सांगितले होते की, २००६ साली तिने बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री करण्याबद्दल विचार केला होता, ती बर्याच लोकांशी बोलू लागली आणि त्यांना भेटायला देखील गेली. पण त्या काळात लोकांनी तिला साथ दिली नाही. याउलट लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. त्या अपघातानंतर तिला लिपस्टिक कशी वापरायची, हेदेखील माहित नव्हते. लोकांनी तिचे आधीचे आणि नंतरचे फोटो खूप शेअर केले. तिचा नो-मेकअप फेससुद्धा सगळीकडे दिसला. हेच कारण होते जेव्हा तिने हे सर्व पाहिले, तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली आणि तिने पुन्हा त्या मार्गापासून स्वतःला दूर केले.
अनु अग्रवाल सामाजिक कार्यात सक्रीय
आता अनु अग्रवाल योग जीवनशैली जगत आहे आणि सामाजिक कार्य करत आहे. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. इतकंच नाही तर मानसिक आरोग्य, पर्यावरण जागरूकता आणि तणाव दूर करण्यासाठी ती 'अनु अग्रवाल फाऊंडेशन' चालवत आहे.