Life After Marriage बिपाशा बासुचे पालटले आयुष्य, लग्नाविषयी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 13:35 IST2019-04-17T13:32:13+5:302019-04-17T13:35:00+5:30
३० एप्रिलला 2016 रोजी अभिनेता करण ग्रोव्हरसह बिपाशा बासु लग्नबंधनात अडकली होती.

Life After Marriage बिपाशा बासुचे पालटले आयुष्य, लग्नाविषयी केला मोठा खुलासा
प्रत्येक मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस हा सर्वांत सुंदर क्षण असतो. लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्याची नवीन सुरूवात असते अशाच लग्नानंतरच्या आयुष्यावर पहिल्यांदाच बिपाशा बासुने आपला अनुभव तिच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. ३० एप्रिलला 2016 रोजी अभिनेता करण ग्रोव्हरसह बिपाशा बासु लग्नबंधनात अडकली होती. येत्या 30 एप्रिलला बिप्सच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण होणार आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच बिप्सने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
तिने सांगितले की, लग्नाचे तिन वर्ष माझ्यासाठी खूप सुंदर होते. विशेष म्हणजे आपला लाईफ पार्टनर हा आपला चांगला मित्र असावा असाच करणही आहे. त्याच्या येण्याने ख-या अर्थाने माझ्या आयुष्य पूर्ण झाले असे मी मानते. रूसवे -फुगवे सारे काही करण बरोबर मी एन्जॉय करत आहे.
करणने श्रद्धा निगमसह पहिले लग्न केले होते. मात्र तेही जास्त दिवस टिकले नाही. पहिले लग्न संपुष्टात आल्यानंतर जेनिफर विंगेटसह त्याने दुसरे लग्न केले. 'दिल मिल गये' मालिकेच्या सेटवर जेनिफर आणि करणची भेट झाली होती. दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की, दोघांनाही सतत एकमेकांच्या नावाने चिडवले जायचे. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर करणचा खरा चेहरा समोर आला आणि दोघांमध्ये खटके उडायला सुरूवात झाली. दोघांनाही एकमेकांसह राहणंही जेव्हा अशक्य वाटू लागले तेव्हा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर 2015 मध्ये करण बिपाशाच्या संपर्कात आला. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. दोघांच्याही आवडी-निवडी जुळत असल्यामुळे करणने बिपाशासह तिसरे लग्न केले.