राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री जगतेय हलाखीचे जीवन; लहान वयात साकारली होती सेक्स वर्करची भूमिका !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 10:21 AM2018-02-04T10:21:34+5:302018-02-04T15:53:57+5:30
७०च्या दशकातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री रेहाना सुल्तान पुन्हा एकदा चर्चेत आहे. रेहाना त्याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी १९७० मध्ये आलेल्या ...
७ च्या दशकातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री रेहाना सुल्तान पुन्हा एकदा चर्चेत आहे. रेहाना त्याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी १९७० मध्ये आलेल्या ‘चेतना’ या चित्रपटात अतिशय लहान वयात सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना लोकप्रियता, पैसा मिळवून दिलाच शिवाय नॅशनल अवॉर्डही मिळवून दिला. पुढे रेहानाने अनेक चित्रपटात बोल्ड सीन देऊन इंडस्ट्रीत आपला दबदबा निर्माण केला. परंतु सध्या रेहाना अतिशय हलाखीचे जीवन जगत आहे. आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनकडून दर महिन्याला मदत मिळत असल्यानेच त्यांचा उदरनिर्वाह होत आहे.
रेहानाने वयाच्या ३४व्या वर्षी स्वत:पेक्षा १६ वर्षांनी मोठ्या असलेल्या दिग्दर्शक बीआर इशारा यांच्याशी १९८४ मध्ये लग्न केले होते. आपल्या इमेजबद्दल रेहानाने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी मी चित्रपटांमध्ये केवळ एक टाइप्ड अभिनेत्री बनली होती. कारण प्रेक्षकांना वाटत होते की, मी सेक्शुअॅलिटीचे दुसरे नाव आहे. दिग्दर्शक तर मला केवळ बाथटब किंवा पावसात भिजणारीच भूमिका द्यायचे. मला एका ठराविक काळानंतर अशा भूमिकांचा तिटकारा आला होता.
रेहानाचे पती बीआर इशारा यांचे २०१२ मध्ये निधन झाले. अखेरच्या दिवसांमध्ये त्यांनी इंडस्ट्रीत काम करणे बंद केले होते. त्यामुळे रेहानासाठी कुठल्याही प्रकारची संपत्ती किंवा बॅँक बॅलेन्स ते मागे सोडून गेले नाहीत. आर्थिक तंगीमुळे दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी रेहानाला ‘इनकार’ (२०१३) या चित्रपटात एक भूमिका दिली होती. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता अर्जुन रामपाल आणि चित्रांगदा सिंग होते. चित्रपटसृष्टीत जवळपास गायब झालेली रेहाना अजूनही कॅमबॅक करण्याची इच्छा ठेवून आहेत. त्यांच्या मते, अभिनयासाठी कुठलेही वय नसते. त्यातच हल्लीच्या काळात कॅबेºयांपासून ती चित्रपट बनविण्यापर्यंत सर्वच काही बदलून गेल्याने मला चित्रपटांमध्ये भूमिका मिळणार नाहीत हे मी जाणून आहे.
१९ नोव्हेंबर १९५० मध्ये इलाहाबाद येथे जन्मलेल्या रेहाना यांनी पुण्याच्या एफटीआयआयमध्ये अभिनयात पदवीचे शिक्षण घेतले. १९६७ मध्ये पदवी घेतल्यानंतर विश्वनाथ अयंगर यांच्या ‘शादी की पहिली सालगिरह’ या डिप्लोमा चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दिग्दर्शक राजिंदरसिंग बेदी यांनी १९७० मध्ये ‘दस्तक’ या चित्रपटात त्यांना भूमिका दिली. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगिरीत नॅशनल अवॉर्डही मिळाला. त्यानंतर रेहाना यांनी ‘हार-जीत, प्रेम पर्वत आणि किस्सा कुर्सी का’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
‘दस्तक’ या चित्रपटाची कथा अशा एका दाम्पत्यावर आधारित होती, जे मुंबईत आल्यानंतर नकळपणे येथील एका वेश्यालयात फ्लॅट भाड्याने घेतात. याच बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर एक नर्तकी राहात असते. या चित्रपटात रेहानाने एका अशा पत्नीची भूमिका साकारली जी घरात नेहमीच एकटी असते अन् तिचा पती कामासंदर्भात नेहमी बाहेर असतो. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रेहानाला न्यूड दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात त्यांनी बोल्ड भूमिका केल्यानंतर त्यांना अशाच स्वरूपाच्या भूमिका आॅफर झाल्या. त्यातील अनेक भूमिका त्यांनी नाकारल्या.