शाहरूखने मोठ्या कष्टाने कमावलेल्या ‘या’ गोष्टीवर आहे विजय देवरकोंडाचा डोळा, वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:33 PM2022-08-24T12:33:29+5:302022-08-24T12:35:47+5:30

Liger actor Vijay Deverakonda : होय, शाहरूखने इतक्या वर्षांत मोठ्या मेहनतीने कमावलेल्या एका गोष्टीवर विजयचा डोळा आहे. खुद्द विजयनेच याचा खुलासा केला आहे.

liger actor vijay deverakonda want to steal king title from shahrukh khan | शाहरूखने मोठ्या कष्टाने कमावलेल्या ‘या’ गोष्टीवर आहे विजय देवरकोंडाचा डोळा, वाचून थक्क व्हाल

शाहरूखने मोठ्या कष्टाने कमावलेल्या ‘या’ गोष्टीवर आहे विजय देवरकोंडाचा डोळा, वाचून थक्क व्हाल

googlenewsNext

साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) ‘लाइगर’ (Liger) हा सिनेमा उद्या गुरूवारी चित्रपटगृहांत रिलीज होतोय. विजयचा हा सिनेमा किती गर्दी खेचतो, ते दिसलेच. पण तूर्तास त्याची चिंता नाही तर चिंता वेगळीच आहे.  विजय देवरकोंडाला चक्क ‘किंगखान’ शाहरूख खानकडून (Shahrukh Khan) एक गोष्ट चोरायची आहे. होय, शाहरूखने इतक्या वर्षांत मोठ्या मेहनतीने कमावलेल्या एका गोष्टीवर विजयचा डोळा आहे. खुद्द विजयनेच याचा खुलासा केला आहे.

अलीकडे एका न्यूज पोर्टला दिलेल्या मुलाखतीत विजय यावर बोलला. अशी कोणती गोष्ट आहे, जी तू शाहरूखकडून चोरू इच्छितो?असा प्रश्न विजय देवरकोंडाला या मुलाखतीत विचारला गेला.  विजयने काय उत्तर दिलं माहितीये? तर शाहरूखचं ‘किंग’ हे टायटल, असं क्षणाचाही विलंब न करता विजय म्हणाला. तुम्हाला ठाऊक आहेच की, शाहरूखला चाहते ‘किंगखान’ म्हणूनही ओळखतात. बरीच मेहनत करून शाहरूखने ‘किंग’ हे टायटल मिळवलं आहे. या टायटलमागे शाहरूखचा स्ट्रगल आहे, चाहत्यांचं अपार प्रेम आहे. पण आता विजयचा त्याच्या या टायटलवर डोळा आहे. अद्याप शाहरूख यावर काहीही बोललेला नाही. तो काय बोलतो ते बघूच.


 
 रश्मिका मंदानाकडून हवी ही एक गोष्ट...

 साऊथ सेन्सेशन रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. खरं काय, ते दोघांनाच ठाऊक़ पण रश्मिकाच्याही एका गोष्टीवर विजय देवरकोंडाचा डोळा आहे.  रश्मिका मंदानाची कोणती एक गोष्ट तुला चोरायची आहे, असा प्रश्न त्याला केल्यावर, तिची इच्छा शक्ती, असं उत्तर विजयने दिलं.  रश्मिका जे ठरवते, तेच करते. तिची इच्छाशक्ती दुर्दम्य आहे. तिचा हाच गुण मला माझ्यात हवा आहे, असं तो म्हणाला. 
विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर या सिनेमात विजय बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.  करण जोहरची निर्मिती असलेला  हा चित्रपट उद्या 25 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. यात विजयच्या अपोझिट अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय राम्या कृष्णन, मकरंद देशपांडे, रोनित रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: liger actor vijay deverakonda want to steal king title from shahrukh khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.