Liger Advance Booking Report: ‘लाइगर’ करणार का धमाका? 24 तासांत हातोहात खपली इतकी तिकिटं, रिलीजआधीच कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:01 PM2022-08-22T12:01:15+5:302022-08-22T12:06:11+5:30
Liger Advance Booking Report: येत्या गुरूवारी म्हणजे 25 ऑगस्टला ‘लाइगर’ चित्रपटगृहांत धडकणार आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे.
Liger Advance Booking Report: साऊथ सिनेमाचा सुपरस्टार विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) ‘लाइगर’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि सध्या तरी चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय. होय, देवरकोंडाचा हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. येत्या गुरूवारी म्हणजे 25 ऑगस्टला सिनेमा चित्रपटगृहांत धडकणार आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. काही ठिकाणी चित्रपटांची अॅडव्हान्स तिकिट विक्री देखील सुरू झाली आहे. तिकिटबारीवर या चित्रपटाला कसा रिस्पॉन्स आहे? तर गेल्या 24 तासांत ‘लाइगर’ची 34 हजार तिकिटांची विक्री झाली आहे.
कोईमोई या इंग्रजी पोर्टलने दिलेल्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत ‘लाइगर’ची एकूण 65 लाख तिकिटं विकली गेली आहे. एकट्या तेलगू व्हर्जनच्या सिनेमाची 60 लाख तिकिटं खपली आहे. हिंदी प्रेक्षकांनी आत्तापर्यंत 5 लाख तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. म्हणजेच काय तर, ‘लाइगर’च्या तेलगू व्हर्जनने रिलीजआधीच 60 लरख रूपयांचं कलेक्शन केलं आहे. तर हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमधून 5 लाखांचा गल्ला जमवला आहे.
‘लाइगर’ हा सिनेमा पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होतोय. साहजिकच विजय देवरकोंडाच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विजय देवरकोंडाच्या अपोझिट अनन्या पांडे लीड रोलमध्ये आहे.
हिंदी व्हर्जन करणार निराशा?
अॅडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसाद बघता विजय देवरकोंडा नक्कीच खूश्श असणार. पण ‘लाइगर’च्या हिंदी व्हर्जनने मेकर्सची चिंता वाढली आहे. कारण सोशल मीडियावर ‘लाइगर’ला बायकॉट करण्याची मागणी होत आहे. बायॅकॉट टेंडमुळे अनेक मोठे सिनेमे आपटले. अशात विजय देवरकोंडाचा हा सिनेमा किती कमाई करतो, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.