साऊथ सेन्सेशन vs लीजेंड बॉक्सर..! ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडासोबत झळकणार माईक टायसन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 04:22 PM2021-09-29T16:22:42+5:302021-09-29T16:24:18+5:30

Liger : वसूल केली विजय देवरकोंडापेक्षाही अधिक फी, पाहा टीझर

liger mike tyson get whopping amount higher than vijay devarakonda fees | साऊथ सेन्सेशन vs लीजेंड बॉक्सर..! ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडासोबत झळकणार माईक टायसन

साऊथ सेन्सेशन vs लीजेंड बॉक्सर..! ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडासोबत झळकणार माईक टायसन

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लायगर’बद्दल सांगायचं तर करण जोहरची निर्मिती असलेला हा सिनेमा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ हे दिग्दर्शित करणार आहेत. पुरी हे प्रसिद्ध तेलगू चित्रपट दिग्दर्शक आहेत.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘लायगर’ (Liger) या आगामी सिनेमाकडे पे्रक्षक डोळे लावून बसले आहेत. कारणही खास आहे. साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) या चित्रपटाद्वारे बॉलिवूड पदार्पण करतोय.  विजय देवरकोंडासोबतच या सिनेमात जगातला टॉप बॉक्सर अशी ओळख असलेला माईक टायसन (Mike Tyson)  सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे. अ‍ॅक्शन आणि स्टंटची भरमार शिवाय विजय व माईकची जुगलबंदी पाहायला चाहते उत्सुक नसतील तर नवल.
आता याचनिमित्ताने आणखी एक बातमी येतेय. होय, माईक टायसनने म्हणे या चित्रपटासाठी विजय देवरकोंडापेक्षाही अधिक फी घेतली आहे. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राच्या हवाल्याने बॉलिवूड लाईफने याबाबतचे वृत्त दिले आहे.

म्हणायला माईकची भूमिका फार मोठी नाही. तो कॅमिओ रोलमध्ये दिसणार असल्याचीही चर्चा आहे. पण तरिही या चित्रपटासाठी त्याने तगडी फी वसूल केली आहे. माईक मोठा लीजेंड आहे. जगभरात त्याचं नाव आहे. साहजिकच त्यानं तोंडातून काढलेली रक्कम त्याला मिळणार होती. झालं सुद्धा तेच.
तूर्तास गोव्यात या बिग बजेट सिनेमाचं शूटींग सुरू आहे आणि लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हिंदीसोबतच तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा तयार होतोय. विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पण खरी उत्सुकता देवरकोंडा आणि टायसनच्या जोडीची आहे. ही जब्राट जोडी पडद्यावर काय धम्माल करते, ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

माईक टायसनचं नाव जगातील सर्वात महान बॉक्सरमध्ये घेतलं जातं.  1985 ते 2005 पर्यंत बॉक्सिंग क्षेत्र गाजवणाºया याच माईकवर 1992 साली बलात्काराचे आरोप झाले होते. ते आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला 6 वर्ष कारवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर माईक 1995 मध्ये जेलमधून बाहेर पडला होता. बॉक्सिंग पाठोपाठ तो अभिनय क्षेत्रातही कार्यरत झाला. तो 2009 मध्ये आलेल्या ‘हँगओव्हर’ या हॉलिवूड चित्रपटात दिसला होता. 
‘लायगर’बद्दल सांगायचं तर करण जोहरची निर्मिती असलेला हा सिनेमा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ हे दिग्दर्शित करणार आहेत. पुरी हे प्रसिद्ध तेलगू चित्रपट दिग्दर्शक आहेत.  पोक्किरी,गोलीमार, टेंपर सारखे हिट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. शर्त-दी चॅलेंज आणि बुड्ढा होगा तेरा बाप हे दोन बॉलिवूड सिनेमेही त्यांनी दिग्दर्शित केले होते.

Web Title: liger mike tyson get whopping amount higher than vijay devarakonda fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.