Vijay Deverakonda : सगळे विजय देवरकोंडाच्या प्रेमात, तो ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या प्रेमात...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 11:38 AM2022-08-23T11:38:33+5:302022-08-23T11:41:29+5:30

Vijay Deverakonda Crush: विजय देवरकोंडाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून चाहते क्रेझी झाले आहेत. पण हा विजय देवरकोंडा कुणासाठी ‘क्रेझी’ आहे माहितीये? तर दोन मराठमोळ्या अभिनेत्रींसाठी...

Liger star Vijay Deverakonda Has A Crush On Urmila Matondkar And Bhagyashree | Vijay Deverakonda : सगळे विजय देवरकोंडाच्या प्रेमात, तो ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या प्रेमात...!

Vijay Deverakonda : सगळे विजय देवरकोंडाच्या प्रेमात, तो ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या प्रेमात...!

googlenewsNext

साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचे (Vijay Deverakonda) जगभर चाहते आहेत. तरूणाई तर त्याच्यावर फिदा आहेत. सध्या विजय देवरकोंडा ‘लाइगर’ (Liger) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. विजय व या चित्रपटातील त्याची को-स्टार अनन्या पांडे देशभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत आणि विजय देवरकोंडाची एक झलक पाहायला मिळावी म्हणून चाहते क्रेझी झाले आहेत. पण हा विजय देवरकोंडा कुणासाठी ‘क्रेझी’ आहे माहितीये? तर दोन मराठमोळ्या बॉलिवूड अभिनेत्रींसाठी. होय, दोन मराठमोळ्या बॉलिवूड अभिनेत्रींचा विजय देवरकोंडाच जबरा फॅन आहे. खुद्द त्यानेच एका शोमध्ये हा खुलासा केला.

 नुकतंच विजय व अनन्या दोघं ‘डीआयडी सुपर मॉम’ (DID Super Moms) या डान्स रीयालिटि शोमध्ये प्रमोशनसाठी पोहोचले. या कार्यक्रमात विजयला त्याची क्रश कोण? असा प्रश्न विचारला गेला. यावेळी विजय देवरकोंडाने चक्क दोन मराठमोळ्या अभिनेत्रींची नावं घेतली. या दोघी कोण तर उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री.‘मीउर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री यांचा खूप मोठा फॅन आहे. मी त्यांचं काम पाहिलं आहे. लहानपणी  माझा त्यांच्यावर क्रश होता. अजूनही आहेच..,’ असं तो म्हणाला.
खास म्हणजे, उर्मिला व भाग्यश्री यांच्यासमोर त्याने ही कबुली दिली. उर्मिला व भाग्यश्री दोघी हा डान्स रीयालिटि शो जज करत आहेत.

रेमो डिसूझा या शोचा जज आहे. यावेळी विजयने रेमोचे सुद्धा कौतुक केले. ‘मी रेमोचाही खूप मोठा चाहता आहे. त्याच्या ‘बदतमीज दिल’ गाण्यामधली कोरिओग्राफी पाहून मला या माणसाला भेटायची उत्सुकता आणखीनच वाढली होती, ’असं तो म्हणाला.
विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा सिनेमा येत्या 25 तारखेला रिलीज होतोय. अर्थात रिलीजआधी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर बायकॉट लाइगर ट्रेंड होत आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा बॉक्सरच्या भूमिकेत आहे.

Web Title: Liger star Vijay Deverakonda Has A Crush On Urmila Matondkar And Bhagyashree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.