शाळेसाठी रेखा देणार तीन कोटींचा निधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 04:17 PM2018-02-15T16:17:29+5:302018-02-15T21:51:31+5:30
अभिनेत्री रेखा या कासारवाडी येथील एका शाळेच्या निर्माणासाठी खासदार निधीतून तीन कोटी रुपये देणार आहेत. कासारवाडी पिंपरी छिंदवाडा महापालिकेअंतर्गत ...
अ िनेत्री रेखा या कासारवाडी येथील एका शाळेच्या निर्माणासाठी खासदार निधीतून तीन कोटी रुपये देणार आहेत. कासारवाडी पिंपरी छिंदवाडा महापालिकेअंतर्गत ही शाळा येते. या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या निर्मितीसाठी जवळपास १४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही शाळा पीपीपीच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेल अंतर्गत बनविण्यात येत आहे. रेखा यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.
द इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार, श्याम लांडे या स्थानिक नगरसेवकाने सांगितले की, ‘मुंबईच्या जिल्हाधिकाºयांनी पुणे जिल्हाधिकाºयांना एक पत्र पाठविले आहे. आम्ही प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कागदपत्रे, अंदाजे खर्च आणि डिझाइनची कॉपी सर्व काही जमा केले आहे. पीसीएमसीच्या अधिकाºयांतर्फे मिळालेल्या मााहितीनुसार गेल्यावर्षी शाळेच्या निर्मितीसाठी २० लाख रुपयांची मदत जमा झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पीसीएमसीचे अधिकारी शाळेच्या फंडासाठी प्रयत्नशील आहेत. याच प्रकरणी आम्ही रेखा यांच्याशी संपर्क साधला होता.’
दरम्यान, रेखा यांच्याकडून सुरुवातीला यासंदर्भात कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नसल्याने हा प्रोजेक्ट पेंडिंग होता. आता पुन्हा रेखा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मदत देण्यास होकार दिला आहे. लांडे यांनी सांगितले की, कासारवाडी परिसरात ही पहिलीच इंग्लिश मीडियम शाळा असणार आहे. वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, रेखा सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नाहीत. अखेरीस त्या ‘शमिताभ’मध्ये बघावयास मिळाल्या होत्या.