लिजा रे बनली आई, दिला जुळ्या मुलींना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:32 PM2018-09-17T12:32:43+5:302018-09-17T12:44:05+5:30

अभिनेत्री लिजा रेने जूनमध्ये जॉर्जियामध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.

Lisa Ray gave birth to twin girls | लिजा रे बनली आई, दिला जुळ्या मुलींना जन्म

लिजा रे बनली आई, दिला जुळ्या मुलींना जन्म

ठळक मुद्दे लिजा रे बनली आई लिजा व जेसन यांनी आपल्या मुलींची नावे ठेवली सूफी व सोलेल


बॉलिवूड अभिनेत्री लिजा रे आई बनली असून तिने नुकतेच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. सरोगसीमार्फत तिने जॉर्जियामध्ये दोन मुलींना जन्म दिला आहे. २००९ साली लिजाला मल्टिपल मिलोमा नावाचा कॅन्सर झाला होता.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लिजा रे म्हणाली की, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे जे मी शब्दात सांगू शकत नाही. मुलींकडे लक्ष देण्यासोबत मला इतर गोष्टींदेखील एकत्र मॅनेज करावे लागत आहेत. जसे की स्वतःकडे लक्ष देणे, आपल्या कामाकडे वेळ देणे व मित्रमंडळी, नवरा आणि कुटुंबासमवेत एकत्र वेळ व्यतित करावे लागत आहे. माझ्या मुलींना लवकर मुंबईला घेऊन यायचे आहे. जेसन हेडनीसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर मला आई बनण्याची इच्छा झाली. 

लिजा व जेसन यांनी आपल्या मुलींची नावे सूफी व सोलेल ठेवले आहे. लिजाला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते त्यावेळी तिला ती आई होऊ शकणार नाही असे वाटले होते. याबाबत लिजा सांगते की, माझे नशीब चांगले असून हल्लीच्या तंत्रज्ञानावर माझी आशा कायम आहे आणि त्याचा वापर आई होण्यासाठी करता येऊ शकते. त्यानंतर मी व माझ्या नवऱ्याने सरोगसीचा पर्याय निवडला.
जेनसबद्दल बोलताना लिजा म्हणाली की, मी व माझा नवरा वयाच्या चाळीस वर्षानंतर आई-वडील बनलो आहोत. आमच्यासाठी हा योग्य वेळ आहे. मला जेसनला वडीलांच्या भूमिकेत पाहायचे आहे ज्यात तो मुलींना सांभाळतो आहे व त्यांचे डायपर्स बदलतो आहे.
मुलींना चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न लिजा करणार आहे. मला माझ्या मुलींच्या कानात सांगाण्यासाठी बैचेन आहे की भविष्य महिलांचे आहे.
 

Web Title: Lisa Ray gave birth to twin girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.