अभिनेत्री लीजा रेने घेतला मोठा निर्णय, वाचून चाहतेही होतील नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 12:18 PM2020-12-29T12:18:55+5:302020-12-29T12:24:16+5:30

लिजा आपल्या मुलींचे बालपण एन्जॉय करते. 'सूफी' आणि 'सोलेल' या दोन्ही मुलींची नावे आहेत. आपल्या लाडक्या लेकींचे सगळे क्युट फोटो ती सोशल मीडियावर अपलोड करत असते.

Lisa Ray takes a break from social media | अभिनेत्री लीजा रेने घेतला मोठा निर्णय, वाचून चाहतेही होतील नाराज

अभिनेत्री लीजा रेने घेतला मोठा निर्णय, वाचून चाहतेही होतील नाराज

googlenewsNext


लिसाने 2012 मध्ये जेसन डेनीसोबत लग्न केले. 2018 मध्ये तिने सुफी व सोलेल या जुळ्या मुलींना जन्म दिला. दीपा मेहताच्या ‘वॉटर’ या चित्रपटातील लिसाची भूमिका प्रचंड गाजली होती. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली होती ती नुसरत फतेह अली खान यांच्या ‘आफरीन आफरीन’ या गाण्यामुळे. 2001 मध्ये प्रदर्शित ‘कसूर’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता.

 

याशिवाय 'वीरप्पन' आणि 'दोबारा' या सिनेमातही ती झळकली. पण तिचा सगळा फोकस अ‍ॅक्टिंगपेक्षा लेखनावर होता. लिजाचे ‘इन क्लोज टू द बोन’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोशल मीडियावर प्रत्येक सेलिब्रेटी सक्रीय आहे. त्याच्याशी संबंधीत सगळ्याच अपडेट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. आपले व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. 

अभिनेत्री लीजाही सोशल मीडियावर सक्रीय होती. तिची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांना रस होता. तिचे प्रत्येक फोटो व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटस करत असल्याचे पाहायला मिळायचे. लीजाला दोन जुळ्या मुली आहे. सध्या ती मदरहुड एन्जॉय करते. गेल्या कित्येक वर्षापासून बॉलिवूडपासूनही ती लांब आहे. सध्या तिचे वैवाहिक आयुष्य ती एन्जॉय करतेय.

नुकतेच लीजाने एक सोशल मीडियापासूनही लांब जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळासाठी ती सोशल मीडियावर एक्टीव्ह नसेल. पुढच्या वर्षीच ती पुन्हा ऑनलाइन येणार असल्याचे तिने म्हटले आहे. घराचा एक फोटो शेअर करत तिने समर्पक कॅप्शन दिली आहे. यावेळीच तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्याचे सांगितले आहे.

मध्यंतरी लीजाने तिचा नो मेकअप फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने म्हटले होते की, होय मी आहे 47 वर्षांची. स्वच्छंदी आणि कुठल्याही मेकअपशिवाय. तुमच्यात अशी हिंमत आहे? मी तरूण होती, तेव्हा माझ्यातही अशी हिंमत नव्हती. प्रत्येकजण तुमचे मोल समजू शकत नाही. पण स्वत:च्या शरीरावर प्रेम करायला शिका. स्वत:ला स्वीकारा. महिलांनो, स्वत:चे मोल जाणा...,’ असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले होते.


सध्या लिजा आपल्या मुलींचे बालपण एन्जॉय करते. 'सूफी' आणि 'सोलेल' या दोन्ही मुलींची नावे आहेत. आपल्या लाडक्या लेकींचे सगळे क्युट फोटो ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. नुकतेच लिजाने आपल्या मुलींचे साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताच या फोटोंवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Lisa Ray takes a break from social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.