टायगर श्रॉफची अट ऐकून आयोजकांना फुटला घाम! चाहत्यांची झाली निराशा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 09:26 AM2018-03-27T09:26:43+5:302018-03-27T14:56:43+5:30
चाहत्यांची मने जिंकण्यासाठी टायगर श्रॉफ ‘बागी2’ घेऊन येतोय. पण या चित्रपटाच्या रिलीज आधी, टायगरने असे काही केलेय की, काहींचा ...
च हत्यांची मने जिंकण्यासाठी टायगर श्रॉफ ‘बागी2’ घेऊन येतोय. पण या चित्रपटाच्या रिलीज आधी, टायगरने असे काही केलेय की, काहींचा हिरमोड नक्की आहे. होय, ‘बागी2’च्या रिलीजआधी टायगरला आपल्या काही चाहत्यांसोबत साऊथ आफ्रिकेत केपटाऊनच्या एका अॅडव्हेंचर ट्रिपवर जायचे होते. पण ऐनवेळी टायगरने अशी काही अट ठेवली की, केपटाऊनची ही ट्रिप रद्द करावी लागली. साहजिकचं चाहत्यांची निराशा झाली.
आता ही केपटाऊनची ट्रिप नेमके काय प्रकरण आहे तर ते आम्ही तुम्हाला सांगतो. टायगर एका इनरविअर ब्रॅण्डचा ब्रॅण्ड अॅम्बिसीडर आहे, हे तुम्ही जाणताच. या ब्रॅण्डने आपल्या ग्राहकांसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना टायगरसोबत केपटाऊनला एका अॅडव्हेंचर ट्रिपवर जाण्याची संधी मिळणार होती. ही स्पर्धा यशस्वी पार पडली. त्यानुसार, २०१८ मध्ये आयोजकांनी टायगरशी संपर्क साधला आणि या ट्रिपबद्दल सांगितले. टायगरनेही हिरवी झेंडी दिली. यानिमित्ताने ‘बागी2’ प्रमोट करता येईल, असे त्याला वाटले. गत फेबु्रवारीमध्ये आयोजकांनी पुन्हा एकदा टायगरला ही ट्रीप कन्फर्म करण्यासाठी फोन केला. तेव्हाही टायगरने होकार दिला. पण यावेळी त्याने एक अट आयोजकांसमोर ठेवली. आता ही अट काय होती? तर माझ्यासोबत माझी सहा सदस्यांची टीमही येईल, अशी ती अट होती. टायगरची ही अट निश्चितच आयोजकांना पेलणारी नव्हती. कारण यामुळे त्यांचा बजेट मर्यादेबाहेर जाणार होता. त्यांनी टायगरला ही बाब समजून सांगण्याचा ऐनकेन प्रयत्न केला. पण टायगर काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. अखेर आयोजकांनाच हार पत्करावी लागली आणि टायगरसोबतचा केपटाऊन टूर रद्द झाला. स्पर्धेचे विजेते टायगरला मुंबईतचं भेटतील. टायगर केपटाऊन टूरमध्ये सहभागी होणार नाही, असे आयोजकांनी जाहिर केले.
ALSO READ : -म्हणून ‘बागी2’च्या प्रमोशनदरम्यान सतत आजारी पडतोय टायगर श्रॉफ!!