LIVE : जस्टिन बीबरचा धमाकेदार परफॉर्मन्स; फॅन्सचा एकच कल्लोळ!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2017 04:54 PM2017-05-10T16:54:42+5:302017-05-10T22:44:22+5:30
आज संपूर्ण मुंबई पॉप गायक जस्टिन बीबरमय झाल्याचे दिसून आले. डी. वाय. स्टेडियमवर आयोजित केलेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये जेव्हा जस्टिन ४५ हजारांपेक्षा अधिक फॅन्सच्या साक्षीने परफॉर्मन्स करण्यासाठी आला तेव्हा एकच कल्लोळ करण्यात आला.
आ संपूर्ण मुंबई पॉप गायक जस्टिन बीबरमय झाल्याचे दिसून आले. डी. वाय. स्टेडियमवर आयोजित केलेल्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये जेव्हा जस्टिन ४५ हजारांपेक्षा अधिक फॅन्सच्या साक्षीने परफॉर्मन्स करण्यासाठी आला तेव्हा एकच कल्लोळ करण्यात आला. सूत्रानुसार जस्टिनने गिटारची तार छेडताच तब्बल ५० फॅन्स बेशुद्ध झाले होते. यासर्व फॅन्सवर सध्या ट्रीटमेंट सुरू आहे. या कॉन्सर्टसाठी बॉलिवूडकरांनीही चांगलाच प्रतिसाद दिला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही या कॉन्सर्टची क्षणाक्षणाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. उपलब्ध माहितीनुसार जस्टिनसाठी चॉपरची सुविधा करून देण्यात आली होती. त्याचबरोबर जॅकलिन फर्नांडिसही या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. अतिशय धमाकेदार अशा या कॉन्सर्टमध्ये फॅन्सचा प्रचंड उत्साह बघावयास मिळाला; मात्र त्याचबरोबर आयोजकांकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेचा बोजवाराही उडाल्याचे दिसून आले.
आतापर्यंतच्या लाइव्ह अपडेट्स
८.४८ : अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर कॉन्सर्टमध्ये पोहोचले असता, पाचच मिनिटात त्यांनी तेथून काढता पाय घेतला. बिपाशाने म्हटले की, आमच्याकडे सिक्युरिटी नाही अन् गर्दी पाहता आम्ही कॉन्सर्टमध्ये सहभागी होणे योग्य नाही.
८.४० : बीबरने त्याच्या २५ कलाकारांच्या टीमसोबत सुरू केला परफॉर्मन्स.
८.३० : स्टेजवर जस्टिन बीबरची ग्रॅण्ड एंट्री होताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
८.२० : जस्टिन बीबर स्टेजवर पोहोचला; फटाके वाजवून त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
८.१० : अभिनेत्री सोनाली बेद्रे बीबरला ऐकण्यासाठी कॉन्सर्ट स्थळी पोहोचली.
८.०३ : आलिया भट्ट देखील जस्टिनच्या या कॉन्सर्टचा भाग बनली.
७.५५ : बीबर स्टेजवर पोहोचण्याअगोदरच ५० लोक बेशुद्ध झाल्याच्या बातमी समोर आल्याने, एकच खळबळ उडाली.
७.४० : अभिनेता रोनित रॉय हा देखील कॉन्सर्टच्या ठिकाणी उपस्थित झाला.
७.१५ : जस्टिनची एक चिमुकली फॅन चक्कर येऊन पडली. तिला लगेचच उपचारासाठी नेण्यात आले.
६.५० : आयोजकांच्या व्यवस्थेचा उडाला बोजवारा; प्रेक्षकांकडून प्रचंड तक्रारी, आयोजकांवर केला संताप व्यक्त.
६.२० : डिजे एलन वॉकर याच्या परफॉर्मन्सला सुरुवात. जस्टिन बीबरची अजुनही प्रतिक्षा.
५.५५ : स्टेडियमच्या चहुबाजुने प्लॅस्टिकचा खच पडला, सगळीकडेच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले.
जस्टिनने गायिले हे गीत...
> जस्टिनने ‘वर आर यू नाऊ’ हे गाणे गायिले.
> जस्टिनने यावेळी त्याचे प्रसिद्ध ‘आय विल शो यू’ हे गाणे गायिले.
> जस्टिनने लाइफलाइन हे गाणेही गायिले.
> जस्टिनने म्हटले की, मी खरोखरच नशिबवान आहे की, मला तुमच्यासमोर परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली. आजची रात्र तुमच्या नावे. तुम्ही खूपच चांगले फॅन्स आहेत. येथील वातावरण खूपच गरम आहे.