LIVE : दुबईहून श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू; रात्री उशिरापर्यंत मुंबईत पोहचण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 06:55 AM2018-02-25T06:55:01+5:302018-02-25T14:05:32+5:30

अभिनेत्री श्रीदेवीचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. श्रीदेवीने दुबईत अखेरचा श्वास घेतला. पुतण्याच्या लग्नात सहभागी ...

LIVE: The process of bringing Srebadevi's body from Dubai to India is in progress; Lots of night to reach Mumbai! | LIVE : दुबईहून श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू; रात्री उशिरापर्यंत मुंबईत पोहचण्याची शक्यता!

LIVE : दुबईहून श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू; रात्री उशिरापर्यंत मुंबईत पोहचण्याची शक्यता!

googlenewsNext
िनेत्री श्रीदेवीचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. श्रीदेवीने दुबईत अखेरचा श्वास घेतला. पुतण्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी आपल्या परिवारासोबत दुबईला गेली होती. श्रीदेवीच्या या अचानक एक्झिटमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. दरमयन श्रीदेवीचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या दुबईत पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू असून, पार्थिक रात्री उशिरापर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रीदेवी यांचे पार्थिव सध्या दुबई पोलिसांच्या ताब्यात आहे. 

श्रीदेवीचे पार्थिव यूएईच्या रास अल खैमा येथून दुबई येथे आणण्यात आले आहे. दुबई येथील कायद्यानुसार सुरुवातीला पोलिसांकडून सखोल तपास आणि चौकशी केली जाईल. सुरुवातीला स्थानिक पोलीस तपास करणार, त्यानंतर पोस्टमार्टम केले जाईल. पोलिसांकडून ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पार्थिव परिवाराकडे सुपूर्द केले जाणार आहे. 
 

Saddened by the untimely demise of noted actor Sridevi. She was a veteran of the film industry, whose long career included diverse roles and memorable performances. My thoughts are with her family and admirers in this hour of grief. May her soul rest in peace: PM @narendramodi— PMO India (@PMOIndia) February 25, 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, श्रीदेवीच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. श्रीदेवीचे शेजारी जीसी घोष यांनी श्रीदेवीच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, भारत आणि फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील श्रीदेवीच्या आकस्मिक निधनामुळे दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्विट करताना लिहिले की, प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाळी व अचाकनक निधनामुळे दुखी झालो आहे. करिअरच्या मोठ्या प्रवासात त्यांनी वेगवेगळ्या आणि अविस्मरणीय भूमिका साकारल्या. मी दु:ख क्षणी श्रीदेवीच्या परिवारासोबत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.
 

hocked to hear of passing of movie star Sridevi. She has left millions of fans heartbroken. Her performances in films such as Moondram Pirai, Lamhe and English Vinglish remain an inspiration for other actors. My condolences to her family and close associates #PresidentKovind— President of India (@rashtrapatibhvn) February 25, 2018

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील श्रीदेवीच्या निधनावर शौक व्यक्त केला. आपल्या ट्विटर हॅण्डलवर त्यांनी लिहिले की, ‘श्रीदेवीच्या निधनाच्या बातमीमुळे धक्का बसला. त्यांची ‘मूंदरन पिराई, लम्हे आणि इंग्लिश-विग्लिश’सारखे चित्रपट अन्य कलाकारांसाठी प्रेरणा आहेत. श्रीदेवीच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. 
 

Too shocked and saddened to hear about the sudden demise of sridevi. We have lost a great actor and a person too young. My heartfelt condolence to to the family specially her young daughters. May her soul rest in peace— Priya Dutt (@PriyaDutt_INC) February 25, 2018

प्रिया दत्त
माझी खासदार प्रिया दत्त यांनी देखील श्रीदेवीच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी लिहिले की, श्रीदेवी यांचे अचानकपणे आपल्या सर्वांना सोडून जाणे खूपच धक्कादायक आहे. आपण एका महान कलाकारास कमी वयातच गमावून बसलो. श्रीदेवीच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. 
 

I was shocked to hear the news of her demise. She played an important role in the field of performing arts. We all have seen her capabilities on the screen. This is a huge loss for the nation. I give my heartfelt condolences to her family: Union Minister Piyush Goyal on #Sridevi pic.twitter.com/T3g3nQt4Wd— ANI (@ANI) February 25, 2018

पीयूष गोयल
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले की, श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीमुळे मला धक्का बसला आहे. कलाकार जगतात मी त्यांचा नेहमीच चाहता राहिलो आहे. आपण सर्वांनी पडद्यावर त्यांची अदाकारी बघितली आहे. श्रीदेवीच्या अशा अचानक जाण्याने खूप मोठी हानी झाली आहे. मी श्रीदेवी यांच्या परिवाराबद्दल संवेदना प्रकट करतो. 
 

}}}} ">T 2625 - न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!

T 2625 - न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 24, 2018}}}} ">— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 24, 2018अमिताभ बच्चन
महानायक अमिताभ बच्चन यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘माहित ना का, पण भिती वाटत आहे.’ महानायकच्या या ट्विटच्या काही वेळातच अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाची बातमी समोर आली. 

}}}} ">I have no words. Condolences to everyone who loved #Sridevi . A dark day . RIP— PRIYANKA (@priyankachopra) February 24, 2018प्रियंका चोपडा
प्रियंकाने ट्विटच्या माध्यमातून आपल्या संवेदना व्यक्त करताना लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. ज्यांनी श्रीदेवीवर प्रेम केले त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. 

ममता बॅनर्जी 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून म्हटले की, ‘श्रीदेवीच्या अकस्मात निधनाने खूप दु:ख झाले. सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी श्रीदेवी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा परिवार, सहकारी आणि चित्रपट सृष्टीतील प्रशंसकांप्रती माझ्या संवेदना आहेत. 

राहुल गांधी
कॉँग्रेस अक्षय राहुल गांधी यांनी देखील श्रीदेवीच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ‘भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाची बातमी ऐकुण स्तब्ध झालो आहे. श्रीदेवी खूपच प्रतिभाशाली आणि बहुमुखी अभिनेत्री होत्या. ज्यांनी बºयाचशा भाषांमध्ये अन् आपल्या शैलीने अभिनय क्षेत्रात छाप पाडली. त्यांच्या परिवाराप्रती माझ्या संवेदना आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. 

माधुरी दीक्षित
अभिनेत्री माधुरी दीक्षितने म्हटले की, आताच कळाले की, श्रीदेवी यांचे निधन झाले. त्यांच्या परिवारासाठी माझे मन व्यतीत झाले आहे. जगाने एक खूपच प्रतिभाशाली अभिनेत्रीला गमाविले आहे. ज्यांनी चित्रपटांची विरासत आपल्या मागे सोडली आहे. 

आमिर खान
आमिर खानने ट्विट केले की, मी श्रीदेवीजीच्या निधनामुळे खूपच दु:खी आणि शॉकमध्ये आहे. मी त्यांचा खूप मोठा चाहता राहिलो आहे. ज्या पद्धतीने त्यांनी इंडस्ट्रीत आपले स्थान प्राप्त केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या परिवाराप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. आम्ही नेहमीच तुमच्यातील प्रेमळ वृत्तीचा आदर आणि स्मरण करणार आहोत. 

शेखर कपूर
मिस्टर इंडिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाºया शेखर कपूर यांनी लिहिले की, श्रीदेवींचे निधन झाले. असे वाटत आहे की, एक युग संपले आहे. जसे काही आयुष्याने एक नवे वळण घेतले आहे. एक सुंदर कथा संपली आहे. 

मधुर भंडारकर
मधुर भंडारकर यांनी ट्विट करून लिहिले की, श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीमुळे मी खूप दु:खी झालो आहे. श्रीदेवी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभाशाली अभिनेत्रींपैकी एक होत्या. या दु:खातून सावरण्यासाठी ईश्वर त्यांच्या परिवारास शक्ती देवो. 

स्मृती ईराणी
केंद्रीय सूचना तथा प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांनी ट्विट करताना लिहिले की, ‘श्रीदेवी अभिनयाच्या पावरहाऊस होत्या. यशस्वीतेचा प्रवास अचानक संपला आहे. त्यांच्या परिवाराप्रती माझ्या संवेदना आहेत. 

हेमा मालिनी
हेमा मालिनी यांनी ट्विट करून लिहिले की, श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे धक्का बसला आहे. त्यांनी इंडस्ट्रीत खूप मोठे योगदान दिले आहे. त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. बोनी माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. 

रजनीकांत
तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी लिहिले की, मी खूपच चकीत आणि त्रस्थ झालो आहे. मी एक खूपच प्रेमळ मैत्रिण गमावून बसलो आहे. त्यांचे परिवाराप्रती माझ्या संवेदना आहेत. 

Web Title: LIVE: The process of bringing Srebadevi's body from Dubai to India is in progress; Lots of night to reach Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.