Lock Upp : फेवरेट डिझायनरला पाहून आकर्षित झाली होती Saisha Shinde, रात्र सोबत घालवली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:21 AM2022-05-02T11:21:36+5:302022-05-02T11:22:09+5:30

Lock Upp : एलिमिनेशनपासून स्वत:ला वाचवण्यासाठी शोमध्ये सायशाने (Saisha Shinde) सांगितलं की, कशाप्रकारे एका फेमस डिझायनरला बघून ती त्याच्याकडे आकर्षित झाली.

Lock Upp : Saisha Shinde reveals she slept with an Indian designer | Lock Upp : फेवरेट डिझायनरला पाहून आकर्षित झाली होती Saisha Shinde, रात्र सोबत घालवली आणि मग...

Lock Upp : फेवरेट डिझायनरला पाहून आकर्षित झाली होती Saisha Shinde, रात्र सोबत घालवली आणि मग...

googlenewsNext

कंगना रणौतचा शो 'लॉक अप' (Lock Upp)चा फिनाले आता एका आठवड्यावर आला आहे. शोच्या शेवटच्या जजमेंट एपिसोडमध्ये कंगनाच्या जेलमध्ये कैदी सायशा शिंदे (Saisha Shinde) ने तिचं डार्क सीक्रेट सांगितलं. सायशाचं हे सीक्रेट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

एलिमिनेशनपासून स्वत:ला वाचवण्यासाठी शोमध्ये सायशाने सांगितलं की, कशाप्रकारे एका फेमस डिझायनरला बघून ती त्याच्याकडे आकर्षित झाली. पण नंतर तिला या डिझायनरबाबत हैराण करणारं सत्य समजलं होतं.

सायशाने लॉक अपमध्ये आपलं सीक्रेट सांगितलं की, हे एक असं सीक्रेट आहे जे मी कधीच कुठे सांगितलं नाही. माझे एक फेवरेट इंडियन डिझायनर आहे. जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा मी त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. मी त्यांना मीठी मारली आणि आम्ही संबंध ठेवले. पण नंतर मला समजलं की, साधारण ७ ते ८ मुलांसोबत त्यांनी तसंच केलं होतं. 

सायशाचं हे सीक्रेट जाणून घेतल्यावर सर्वांना धक्का बसला होता, तरीही मोठ्या हिंमतीने ती तिचं डार्क सीक्रेट सांगत राहिली. सायशासोबतच पायल रोहतगीनेही तिच्या खराब रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा केला.

शोबाबत सांगायचं तर लॉक अपला आपले तीन फायनलिस्ट मिळाले आहेत. शिवम शर्मा, मुनव्वर फारूकी आणि प्रिन्स नरूला फिनाले वीकमध्ये पोहोचले आहेत. शोमधील पाचही मुली पायल रोहतगी, अजमा फल्लाह, पूनम पांडे, अंजली अरोरा, सायशा शिंदे डेंजर झोनमध्ये आहेत. गेल्या एपिसोडमध्ये मीडिया राऊंडमध्ये अंजली आणि पूनम वीक गेममुळे त्यांना थेट डेंजर झोनमध्ये पाठवण्यात आलं. अशात आता पूनम आणि अंजलीला एलिमिनेशन राऊंडमध्ये स्वत:ला वाचवण्याची संधी मिळाली नाही.
 

Web Title: Lock Upp : Saisha Shinde reveals she slept with an Indian designer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.