Lock Upp : मी एका कपलसोबत थ्रूपल रिलेशनशिपमध्ये होते..., सायशा शिंदेचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:38 AM2022-05-03T10:38:56+5:302022-05-03T10:50:27+5:30

Lock Upp Show : सायशा शिंदे (Saisha Shinde) हिने तिचं आणखी एक डार्क सीक्रेट उघड केलं आहे. तिनं सांगितलेलं हे डार्क सीक्रेट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

Lock Upp Saisha Shinde Reveals That She Was In Throuple Relationship With Girlfriend And Boyfriend | Lock Upp : मी एका कपलसोबत थ्रूपल रिलेशनशिपमध्ये होते..., सायशा शिंदेचा खळबळजनक खुलासा

Lock Upp : मी एका कपलसोबत थ्रूपल रिलेशनशिपमध्ये होते..., सायशा शिंदेचा खळबळजनक खुलासा

googlenewsNext

कंगना राणौतचा कॉन्ट्रोव्हर्शिअल शो ‘लॉक अप’ (Lock Upp) सध्या जाम चर्चेत आहेत. ‘लॉक अप’मधील स्पर्धक एक तर भांडताना दिसतात किंवा मग स्वत:चे डार्क सीक्रेट उघड करताना दिसतात. आता सायशा शिंदे (Saisha Shinde) हिने तिचं आणखी एक डार्क सीक्रेट उघड केलं आहे. तिनं सांगितलेलं हे डार्क सीक्रेट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. ‘मी एका कपलसोबत थ्रूपल रिलेशनशिपमध्ये होते,’असा खुलासा तिने केले.सायशा बनण्याआधीचं हे रिलेशनशिप असल्याचंही तिने सांगितलं. ३ जण जेव्हा एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्या नात्याला थ्रूपल रिलेशनशिप असं म्हटलं जातं.

पायल रोहतगीसोबत गप्पा मारत असताना सायशानं हा धक्कादायक खुलासा केला. ती म्हणाली, ‘मला आठवतं, मी त्यांना माझ्या आयुष्याबद्दलची पाच सीक्रेट दिली होती. यापैकी एक थ्रूपलबद्दलचं होतं. मी एक बॉयफ्रेंड व त्याचीच गर्लफ्रेन्ड दोघांसोबतही रिलेशनशिपमध्ये होते आणि मी राणीसारखी होते. ते दोघे एकमेकांवर जितकं प्रेम करायचे, त्यापेक्षा अधिक माझ्यावर करायचे. अर्थात ही सायशा बनण्याआधीची गोष्ट आहे. मी सायशा बनले आणि यानंतर मी स्वत:ला एका कोशात बंद केलं. कारण त्यावेळी अनेक गोष्टींबद्दल माझ्या मनात संभ्रम होता. मी विना मेकअप लोकांसमोर जाऊ शकते की नाही? मेकअप केलं नाही तर माझं पौरूषत्व तर दिसणार नाही? असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते.’

मला खूप स्ट्रगल करावा लागला...
मी आधी स्वप्निल शिंदे म्हणून जगत होते. स्वत: समलैंगिक व्यक्ती मानत होते. यानंतर मी लिंग बदल करण्याचा व सायशा बनण्याचा निर्णय घेईपर्यंत मला प्रचंड मोठा स्ट्रगल करावा लागला. पण या शोने मला आत्मविश्वास दिला. आता मला विनामेकअप अख्ख्या जगानं पाहिलं आहे. मी या शोचे खूप आभारी आहे, असंही सायशा म्हणाली.

सायशा ही एक ट्रान्स वुमन आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे याने लिंगबदल शस्त्रक्रिया केली आणि सायशा शिंदे ही आपली नवीन ओळख जगासमोर आणली होती. सायशा ही एक सेलिब्रिटी डिझाईनर आहे. तिने करिना कपूर, दीपिका पादुकोण, कतरिना कैफ, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, सनी लिओनी अशा अनेक सेलिब्रिटींसोबत काम केलंय.

 ‘लॉक अप’बद्दल  सांगायचं तर या शोला आपले तीन फायनलिस्ट मिळाले आहेत. शिवम शर्मा, मुनव्वर फारूकी आणि प्रिन्स नरूला फिनाले वीकमध्ये पोहोचले आहेत. शोमधील पाचही मुली पायल रोहतगी, अजमा फल्लाह, पूनम पांडे, अंजली अरोरा, सायशा शिंदे डेंजर झोनमध्ये आहेत. गेल्या एपिसोडमध्ये मीडिया राऊंडमध्ये अंजली आणि पूनम वीक गेममुळे त्यांना थेट डेंजर झोनमध्ये पाठवण्यात आलं.  
 

Web Title: Lock Upp Saisha Shinde Reveals That She Was In Throuple Relationship With Girlfriend And Boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.