तुफान व्हायरल होतोय ऐश्वर्या रायचा 23 वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ, खास आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 13:22 IST2020-04-07T13:21:41+5:302020-04-07T13:22:28+5:30
तुम्ही पाहिलात?

तुफान व्हायरल होतोय ऐश्वर्या रायचा 23 वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ, खास आहे कारण
ऐश्वर्या राय चित्रपटांपासून भलेही दूर आहे़ पण सोशल मीडियाद्वारे ती सतत चर्चेत असते. कालपरवाच ऐश्वर्याच्या 15 वर्षांपूर्वीच्या एका फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले होते. फॅशन डिझाईनर एश्ले रेबेलो यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले होते. आता तिचा एक जुना व्हिडीओ अचानक व्हायरल होतोय. मजेदार म्हणजे, हा व्हिडीओ ऐश्वर्याच्या अशा चित्रपटाचा आहे, जो कधीच रिलीज झाला नाही.
हा व्हिडीओ 23 वर्षांआधीचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ऐश्वर्या ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसतेय. यात तिने पर्पल कलरचा लहंगा घातलेला दिसतोय आणि ती डान्स स्टेप्स करताना दिसतेय. बॅकग्राऊंडमध्ये गाणे वाजतेय. हा व्हिडीओ 1997 साली शूट झालेल्या राधेश्याम सीताराम या चित्रपटाचा असल्याचा दावा केला जात आहे. या चित्रपटात ऐश्वर्याच्या अपोझिट सुनील शेट्टी होता. परेश रावल यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका होती. पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. कारण त्याआधीच तो डब्बाबंद झाला.
ऐश्वर्याचा हा सुनील शेट्टीसोबतचा पहिला सिनेमा होता. पण हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही. अर्थात यानंतर ऐश्वर्याने सुनील शेट्टीसोबत दोन चित्रपट केले होते.
मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट.
दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला. यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत. हॉलिवूडमध्येही तिने आपली छाप सोडली. कान्समध्ये ज्युरी बनण्याचा मान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे.